Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून आतुरता लागली आहे ती पुणे रिंग रोडच्या कामाची. पुणे रिंग रोड चे काम नेमके केव्हा सुरू होईल? याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान नागरिकांची ही आतुरता आता लवकरच संपुष्टात येणार आहे.
कारण की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकसित केल्या जाणाऱ्या पुणे रिंग रोडचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, Pune Ring Road साठी 15,875 कोटी रुपयांची पात्रता निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे पुणे रिंग रोड साठी इच्छुक कंपन्यांना निविदा भरण्यासाठी आता सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. म्हणजेच सहा महिन्यानंतर या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकते. अर्थात आता दिवाळी अखेरपर्यंत पुणे रिंग रोडचे काम सुरू होणार आहे.
एवढेच नाही तर पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांना देखील वाढीव मोबदला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे रिंग रोड मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत अशा शेतकऱ्यांच्या मोबदल्यात जवळपास पाच ते सहा टक्के वाढ केली जाणार आहे.
कसा आहे हा प्रकल्प?
जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही दशकात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या भीषण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसी अर्थातच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंग रोड हा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
परिणामी शहरात वाहतूक कोंडी होणार नाही असा आशावाद आहे. सध्या या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. हा मार्ग मावळ, मुळशी, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यातून जात आहे. हा मार्ग पुणे-सातारा मार्गावरील वरवे बुद्रुक येथून सुरू होऊन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से पर्यंत असेल. रिंग रोडची एकूण लांबी 172 किलोमीटर असून याची रुंदी 110 मीटर ठेवण्यात आली आहे.