Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी आपणांस सर्वांना चांगलीच ठाऊक आहे. शिक्षणाचे माहेरघर आता वाहतूक कोंडीमुळे विशेष ओळखले जाऊ लागले आहे. नागरिकांना प्रवासासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे.

कित्येकदा अपघातांच्या घटना देखील घडल्या आहेत. हेच कारण आहे की, शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे रिंग रोड विकसित केला जातोय.हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तयार होतोय. राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला हा रिंग रोड १७२ किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा आहे.

विशेष म्हणजे या प्रकल्पाचे काम दोन भागात विभागून केले जाणार आहे.पूर्व आणि पश्चिम असे दोन भागात प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय झाला आहे. या प्रकल्पासाठी जवळपास ७२१ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.

सध्या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पश्चिम रिंग रोड अंतर्गत सुरू असलेल्या भूसंपादनात आत्तापर्यंत 205 हेक्टर जागेचे भूसंपादन झाले असून ही जागा प्रत्यक्षात सरकारच्या ताब्यात आली आहे.

यासाठी जवळपास 1 हजार 25 कोटी रुपयाचा मोबदला देखील संबंधितांना देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी लवकरात लवकर भूसंपादन करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

अशातच मात्र पुणे रिंग रोड बाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.या प्रकल्पाच्या भूसंपादनाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भोर तालुक्यातील पाच गावे भूसंपादनातून वगळली जाणार आहेत.

अर्थात या गावांमध्ये आता भूसंपादन होणार नाही. या गावातील जमीनदारांनी भूसंपादनाचा प्रखर विरोध केला. तसेच गावात भूसंपादन होऊ नये अशी मागणी केली.

या पार्श्वभूमीवर ही गावे भूसंपादनातून वगळण्यात आली आहेत. रांजे, कुसगाव, खोपी, कांजळे, केळवडे, कांबरे आणि नायगाव ही पाच गावे भूसंपादनातून वगळण्याचा निर्णय झाला आहे.

विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील ‘रिंगरोडसाठी राखीव’ अशी नोंद रद्द करण्याची नोटीस काढण्यात आली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *