Pune Rental Homes : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथे वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी या ठिकाणी विविध कोचिंग क्लासेस देखील उपलब्ध आहेत.

दर्जेदार कोचिंग क्लासेस मुळे या शहरात शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी स्थलांतरित होत आहेत. याशिवाय पुणे शहर अलीकडे आयटी हब म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. येथे वेगवेगळ्या आयटी कंपन्या उभारल्या गेल्या आहेत.

यामुळे येथे शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी, नोकरीसाठी आणि व्यवसायासाठी येणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. दरम्यान जे लोक पुण्यात दाखल होतात ते सर्वात आधी राहण्याची व्यवस्था करतात.

असे लोक भाड्याच्या घराच्या शोधात असतात. त्यामुळे अनेकांच्या माध्यमातून पुण्यात राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण कोणते? हा सवाल उपस्थित केला जात होता.

दरम्यान आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. आज आपण पुण्यातील पाच अशा ठिकाणांची माहिती जाणून घेणार आहोत जिथे स्वस्तात भाड्याचे घर उपलब्ध होते.

वारजे : पुण्याच्या मध्यवर्ती भागापासून अवघ्या बारा किलोमीटरच्या अंतरावर बसलेले हे ठिकाण राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते. या भागात स्वस्तात घर उपलब्ध होते. येथे भाड्याची घरे मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. येथे वन बीएचके घरासाठी अकरा ते 16000 आणि टू बीएचके घरांसाठी पंधरा ते वीस हजार रुपये एवढे भाडे आकारले जाते. जर तुमचा एवढा बजेट असेल तर तुम्ही या ठिकाणी भाड्याचे घर घेऊ शकता.

भोसरी : पुण्याच्या मध्यवर्ती भागापासून 18 किलोमीटर अंतरावर वसलेला हा परिसर अनेकांचा हॉट फेवरेट आहे. येथे अनेक लोक वास्तव्याला आहेत. जर तुम्हीही पुण्यात भाड्याचे घर शोधत असाल तर हा परिसर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. येथे वन बीएचके घरांसाठी 9000 ते 17000 आणि टू बीएचके घरांसाठी 17000 ते 25 हजार रुपये प्रति महिना एवढे भाडे आकारले जात आहे.

वाघोली : पुण्यात जर तुम्ही नव्याने आला असाल आणि भाड्याचे घर हवे असेल तर पुण्याच्या रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 14 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेले वाघोली हे ठिकाण तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. येथे वन बीएचके फ्लॅट दहा ते पंधरा हजार रुपये प्रति महिना या दरात भाड्याने उपलब्ध होतात. स्वातंत्र घरांसाठी मात्र 20 हजार रुपये प्रति महिना पर्यंत भाडे आकारले जाऊ शकते.

कात्रज : पुण्यापासून जवळच जर तुम्हाला भाड्याचे घर असेल तर कात्रज हा परिसर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. कात्रज हे पुण्यापासून अवघ्या दहा ते अकरा किलोमीटर अंतरावर आहे. येथे घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहेत. भाड्याने राहण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्कृष्ट आहे. वन बीएचके फ्लॅट साठी साडेसात हजार ते साडेआठ हजार रुपये आणि टू बीएचके फ्लॅट साठी आठ हजार रुपये ते 15 हजार रुपये एवढे भाडे या ठिकाणी आकारले जात आहे.

हिंजवडी : पुण्यातील हा एक पॉश परिसर आहे. येथे घरांच्या किमती अलीकडे वाढल्या आहेत. या ठिकाणी भाड्याचे घर देखील मिळते. या ठिकाणी वन बीएचके घरांसाठी 8000 ते 15000 आणि टू बीएचके घरांसाठी पंधरा हजार ते 22 हजार रुपये प्रति महिना एवढे भाडे आकारले जात आहे. जर तुमचा एवढा बजेट असेल तर हिंजवडी हे ठिकाण देखील तुमच्यासाठी परफेक्ट ठरवू शकते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *