Pune Real Estate Viral News : मुंबईचा जसा अनेकांना हेवा वाटतो तसाच पुण्याचा देखील हेवा वाटतो. अनेकांना पुण्यात घर घ्यायचे आहे. मात्र पुण्यात कुठे घर घ्यावे हे त्यांना सुचत नाही. दरम्यान जर तुम्हीही सांस्कृतिक राजधानी पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच उपयुक्त ठरणार आहे.

खरे तर सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यामध्ये instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होतो. instagram वर अनेक रील्स व्हायरल होत असतात.

सध्या असाच एक रील इंस्टाग्राम वर तुफान वायरल होत आहे. या instagram रील मध्ये पुण्यात घर घेण्यासाठी बेस्ट लोकेशन कोणते आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

दरम्यान यावर नेटकर्‍यांनी भन्नाट उत्तरे दिली आहेत. पुणेकरांनी पुण्यात घर घेण्यासाठी बेस्ट लोकेशन कोणते आहे याबाबत या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये आपले मत नोंदवले आहे.

पुण्यात घर घेण्यासाठी बेस्ट ठिकाण कोणते

तुम्हालाही पुण्यात घर घेण्यासाठी बेस्ट ठिकाण कोणते असा प्रश्न पडला असेल नाही का? दरम्यान हाच तुमच्या मनातला प्रश्न instagram च्या एका रीलमध्ये उपस्थित करण्यात आला होता.

Maze Pune या instagram पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता, या व्हिडिओत पुण्यात घर घेण्यासाठी बेस्ट ठिकाण कोणते आहे? असा प्रश्न विचारला गेला होता. यावर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी पुण्यातील काही भागांची नावे सुचवली आहेत.

नेटकऱ्यांनी हिंजवडी, कर्वेनगर, खराडी, वाघोली, स्पाईन सिटी, बाणेर, कोरेगाव पार्क, वारजे, एफसी रोड, पिंपरी चिंचवड, आळंदी घाट, कोथरूड, हडपसर, केशवनगर मुंडवा, मोशी, मगरपट्टा, सिंहगड रोड, धायरी, एरंडवणे हे परिसर घर घेण्यासाठी बेस्ट असल्याचे या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये म्हटले आहे.

मात्र काही नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत प्रत्येकाला पुण्यातच का गर्दी करायची आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.

यामुळे सध्या हा व्हिडिओ instagram वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आत्तापर्यंत याला हजारो लोकांनी पसंती दाखवली आहे तर लाखो लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्यांची संख्या देखील खूपच अधिक आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *