Pune Real Estate News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. या शहराला अलीकडे आयटी हब आणि फार पूर्वीपासून एज्युकेशनल हब म्हणून ओळखले जाते. शिक्षणाचे माहेरघर असलेले हे शहर अलीकडे गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण बनले आहे. या शहरात राहण्यासाठी अनेक सर्वोत्कृष्ट ठिकाणे आहेत.
विविध शैक्षणिक संस्थानांचे माहेरघर आणि अलीकडे वेगवेगळ्या आयटी कंपन्यांनी हिंजवडी, बाणेर यांसारख्या भागात आपले बस्तान बसवले असल्याने आता पुण्यात प्रत्येकालाच घर बनवावे असे वाटतं आहे.
काही लोक पुण्यात राहण्यासाठी घर घेऊ इच्छित आहेत तर काही लोक निवासी मालमत्तेत गुंतवणूकीसाठी या ठिकाणी प्रॉपर्टी शोधत आहेत. शासनाने 2018 मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार पुणे हे राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे.
मात्र पुण्यात नेमक्या कोणत्या भागात रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक केली पाहिजे किंवा कोणत्या भागात घर घेतले पाहिजे? हा अनेकांचा सवाल असतो. अशा परिस्थितीत आता आपण रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुण्यातील 2 सर्वोत्कृष्ट ठिकाणांबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
हडपसर : पुणे शहरातील वेगाने विकसित होत असलेला भाग म्हणून हडपसर परिसर ओळखला जातो. या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. रस्ते वीज पाणी सारख्या महत्त्वाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. रस्त्यांची चांगली कनेक्टिव्हिटी देखील आहे.
हिंजवडी आणि फुरसुंगी या महत्त्वाच्या आयटी केंद्राला जाने येथून सोयीचे आहे. याशिवाय हडपसर होऊन हिंजवडी ते फुरसुंगी पर्यंत मेट्रो देखील विकसित केली जाणार आहेत. याचे काम वेगाने सुरू असून लवकरच या भागाला मेट्रोची भेट मिळणार आहे. यामुळे येथील विकास आणखी जलद गतीने होईल अशी आशा आहे.
येथे लेक्सिकन स्कूल, जीआईआईएस, एसएम जोशी कॉलेज यांसारखे शैक्षणिक संस्था देखील आहेत. मौसम मॉल, अमनोरा मॉल, वीसीसी मॉल देखील याच भागात आहेत. उपचार हॉस्पिटल आणि लोटस हॉस्पिटल येथे आहे. या ठिकाणी प्रवासासाठी पीएमपीएलच्या बसेस आहेत आणि भविष्यात मेट्रो देखील सुरू होणार आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करता या ठिकाणी निवासी मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. या ठिकाणी 7200 प्रति स्क्वेअर फिट या दराने निवासी मालमत्ता उपलब्ध होत आहे. यामुळे जर तुम्हीही पुण्यात निवासी मालमत्तेत गुंतवणूक करू इच्छित असाल किंवा राहण्यासाठी घर घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी हडपसर हा एक बेस्ट पर्याय ठरणार आहे.
बाणेर : पुण्यात पॉश ठिकाणी जर तुम्हाला निवासी मालमत्ता खरेदी करायची असेल तर बाणेर हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. हा परिसर अतिशय सुसज्ज आणि सर्व आवश्यक सोयी सुविधा युक्त आहे. रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधा तर आहेतच शिवाय हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, मार्केट देखील आहे. येथे पुणे विश्वविद्यालय, नेशनल कॉलेज, ऑर्किड, द इंटरनेशनल स्कूल यांसारखे शैक्षणिक संस्थान देखील आहेत.
प्रिमरोज़ मॉल, रीजेंट प्लाजा मॉल, वेस्टसाइड बाणेर मॉलही येथे विकसित झाले आहेत. जुपिटर हॉस्पिटल, धन्वंतरि हॉस्पिटल, एलीट हेल्थकेयर हॉस्पिटल येथे आहेत. येथे भविष्यात मेट्रो देखील सुरु होणार आहे. शिवाय NH 48 आणि बाणेर-औंध रोडने शहरातील दुसऱ्या भागात देखील सहज जाता येणार आहे. यामुळे येथे निवासी मालमत्ता खरेदी करण्यास चांगला वाव आहे.