Pune Real Estate News : राज्याच्या सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात रोजगाराच्या शोधात आणि शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आणि विद्यार्थी वर्ग स्थायिक झाला आहे.
येथे विविध आयटी कंपन्यांनी देखील आपला जम बसवला आहे. परिणामी पुण्यात घरांच्या किमती सातत्याने वाढू लागले आहेत.
शहराचा सातत्याने विस्तार होत असल्याने औद्योगीकरण वाढत असल्याने येथे घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. मात्र असे असले तरी गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी पुण्यालाच पसंती दाखवली जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण पुण्यातील अशा टॉप तीन ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत जिथे घरांच्या किमती या करोडोच्या घरात आहेत मात्र तरीही लोक या भागात घरे घेण्यास पसंती दाखवतात.
कुठं मिळतात सर्वात महाग घर
डेक्कन जिमखाना : डेक्कन जिमखाना हा शहरातील एक विकसित भाग म्हणून ओळखला जातो. या भागात निवासी मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याला विशेष वाव आहे. शिवाय या परिसरात सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. हा एक पॉश परिसर असून येथे घर घेण्याला विशेष प्राधान्य दाखवले जात आहे.
या भागात वन बीएचके घर 80 लाख ते 1.25 कोटी, टू बीएचके घर 1.25 कोटी ते तीन कोटी, 3 बीएचके घर तीन कोटी ते सात कोटी आणि रो हाऊसेस तसेच बंगलो च्या किमती या पाच कोटी ते दहा कोटीच्या दरम्यान आहेत.
शिवाजीनगर : शहरातील हा एक पॉश एरिया आहे. या भागात घरांच्या किमती या करोडोत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागात वन बीएचके घराची किंमत 50 लाख ते दीड कोटी, टू बीएचके घराची किंमत एक ते तीन कोटी, थ्री बीएचके घराची किंमत चार ते आठ कोटी आणि रो हाऊसेस तसेच बंगलो च्या किमती 6 ते 12 कोटींच्या दरम्यान आहेत.
एरंडवणे : हा देखील पुण्यातील एक पॉश परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात घरांच्या किमती या 70 लाखापासून सुरू होतात.
येथे वन बीएचके घराची किंमत 70 ते 90 लाख, टू बीएचके घराची किंमत 1.20 कोटी ते 2.30 कोटी, थ्री बीएचके घराची किंमत 1.50 कोटी ते 4.25 कोटी आणि बंगलो तसेच रो हाऊसेस च्या किमती पाच कोटींपासूनचं पुढे आहेत.