Pune Real Estate News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून फार पूर्वीपासून ओळखले जात आहे. शिवाय अलीकडे शहराला आयटी हबचा दर्जा मिळाला आहे. याचे कारण म्हणजे शहरात विविध आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे.
यामुळे येथे शिक्षणासाठी आणि रोजगाराच्या शोधात येणाऱ्या लोकांची संख्या खूप अधिक आहे. तसेच ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
यामुळे वेगाने वाढणाऱ्या या शहरात प्रॉपर्टी चे दर देखील आकाशाला भिडले आहेत. येथे घरांच्या आणि जमिनीच्या किमती सातत्याने वाढत आहेत.
तथापि, पुणे शहरात राहण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी घर, प्लॉट, जमीन, फ्लॅट, बंगलो, रो हाऊस खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे.
दरम्यान, आज आपण पुणे शहरात कोणत्या भागात स्वस्तात घर मिळते आणि कोणत्या भागात घरांच्या किमती या प्रचंड वाढल्या आहेत याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण पुणे शहरातील घरांचे रेट कार्ड पाहणार आहोत.
पुण्यातील घरांच्या किमती
- लोहगाव : पुण्यातील लोहगाव परिसरात घरांच्या किमती सर्वात कमी आहेत. येथे वन बीएचके घराची किमत 14 ते 25 लाख, टू बीएचके घराच्या किमती 22 ते 35 लाखाच्या दरम्यान, थ्री बीएचके घराच्या किमती 35 ते 45 लाखाचे दरम्यान तसेच बंगलो आणि रो हाऊसेस च्या किमती 40 ते 70 लाखांच्या घरात आहेत.
- वाघोली : अलीकडे वाघोली भागात देखील घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. तथापि शहरातील इतर भागांच्या तुलनेत येथे घरांच्या किमती थोड्याशा कमी आहेत. या भागात वन बीएचके घराची किंमत 15 ते 25 लाख, टू बीएचके घराची किंमत 22 ते 40 लाख, थ्री बीएचके घराची किंमत 35 ते 55 लाख आणि बंगला रो हाऊसेस यांच्या किमती 30 ते 60 लाखाच्या घरात आहेत.
- बाणेर : अलीकडे या परिसरातील घरांच्या किमती वाढू लागले आहेत. हा पुण्यातील एक वेगाने विकसित होणारा परिसर म्हणून ओळखला जात आहे. या परिसरात वन बीएचके घराची किंमत तीस ते 69 लाख, टू बीएचके घराची किंमत 50 लाख ते एक कोटी, थ्री बीएचके घराची किंमत 80 लाख ते दोन कोटी आणि बंगला तसेच रो हाऊसेसच्या किमती दोन ते सहा कोटींच्या घरात आहेत.
- सातारा रस्ता परिसर : या परिसरातही अलीकडे घर घेणे महाग बनले आहे. या परिसरात जर प्रशस्त घर घ्यायचे असेल तर कोट्यावधी रुपयांचा खर्च करावा लागत आहे. सध्या या परिसरात वन बीएचके घराची किंमत 25 ते 40 लाख, टू बीएचके घराची किंमत 35 ते 70 लाख, थ्री बीएचके घराची किंमत 60 लाख ते सव्वा कोटी आणि बंगलो तसेच रो हाऊसेसच्या किमती 60 लाखापासून ते दीड कोटींच्या घरात आहेत.
- उंड्री-पिसोळी-कोंडवा : या परिसरातही घरांच्या किमती करोडो रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. या भागात वन बीएचके घराची किंमत 25 ते 40 लाख, टू बीएचके घराची किंमत 35 ते 70 लाख, थ्री बीएचके घराची किंमत 70 लाख ते दीड कोटी आणि बंगलो तसेच रो हाऊसेसच्या किमती 60 लाखापासून ते दोन कोटींच्या घरात पोहोचल्या आहेत.