Pune Real Estate News : पुणे शिक्षणाचे माहेरघर, थंड हवेचे ठिकाण आहे. पुण्यामध्ये शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी स्थायिक होत आहेत. सोबतच पुण्याला अलीकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी विशेष ओळखले जात आहे. पुणे आयटी हब म्हणून भारतासह संपूर्ण जगात ख्यातनाम बनले आहे.
म्हणून आता आयटी क्षेत्रात काम करणारे बहुतांशी लोक पुणे शहरात स्थायिक होण्यासाठी धडपड करत आहेत. यामुळे पुणे शहराचा विकास देखील वेगाने केला जात आहे. शहरातील पायाभूत सुविधांमध्ये आता वाढ झाली आहे. पुणे शहरात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आहेत, तसेच लोकसंख्या वाढत असल्याने येथे वेगाने पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. यामध्ये मेट्रो मार्ग विकसित होत आहेत.
नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत आहे, रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. उद्योगधंदे आणि कंपन्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. म्हणून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक स्थायिक होत असून पुण्यात आता मनुष्यबळ देखील वाढले आहे. विशेष म्हणजे राहण्यासाठी पुणे शहर सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत नेहमीच अव्वल राहिले आहे.
हेच कारण आहे की आता पुण्याचा हेवा भल्याभल्यांना वाटू लागला आहे. अनेकांना आता पुण्यामध्ये आपले बस्तान बसवायचे आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेलं पुणे शहर आता आधुनिक शहरांच्या यादीत विराजमान झाले आहे. विशेष म्हणजे नजीकच्या काळात पुणे शहर हे राहण्यायोग्य शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकावर राहणार असल्याचा अंदाज आहे.
म्हणून आता पुणे शहरात घर खरेदीला उधाण आले आहे. आता बहुतांशी नागरिक पुणे शहरात घर खरेदीला प्राधान्य देत आहेत. व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी देखील अनेक गुंतवणूकदार पुढे आले आहेत. व्यवसायिक मालमत्तेची आता मागणी वाढली आहे.
पुण्यातील घरांची विक्री वाढली
घरांच्या विक्री संदर्भात नुकतीच एक मोठी आकडेवारी समोर आली आहे. यानुसार गेल्या आर्थिक वर्षात देशात घरांची विक्री 48 टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे यामध्ये निवासी घरांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, कोलकत्ता या सात शहरांमध्ये घरांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे शहराचा सर्वाधिक घर विक्री होणाऱ्या शहरांमध्ये समावेश आहे. निश्चितच ही बाब पुणे शहरासाठी फायद्याची असून पुण्यातील बांधकाम व्यवसाय क्षेत्राला अलीकडे मोठा बूस्ट मिळाला असल्याचे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मोठ्या घरांना मोठी मागणी
अलीकडे मोठ्या आणि ऐसपैस घरांना नागरिकांच्या माध्यमातून पसंती दाखवली जात आहे. विशेषता कोरोना काळापासून लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. आता लोकं मोठे घर घेण्यास अधिक पसंती दाखवत आहेत. या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यवसायिकांच्या माध्यमातून मोठे घरे तयार केली जात आहेत.
पुणे शहरात देखील मोठ्या ऐसपैस घरांची निर्मिती जोमावर सुरू आहे. पुणे शहरातील आजूबाजूच्या परिसरात अशी मोठमोठी प्रकल्प सुरु आहेत. विशेष म्हणजे या परिसरातील घरांना नागरिकांनी चांगलीच पसंती दाखवली आहे. मोठ्या घरांसोबतच इनडोर आणि आऊटडोर ऍमिनिटीज अलीकडे महत्त्वाचा भाग बनला असून पुणे शहरातील बहुतांशी बांधकाम प्रकल्पात या गोष्टीचा विचार प्रकर्षाने पाहायला मिळत आहे.
गेल्या आर्थिक वर्षात पावणे चार लाख घरांची झाली विक्री
हाती आलेल्या एका आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2022 मध्ये संपूर्ण देशात 2,77,783 घरांची विक्री झाली होती. हाच आकडा 2023 आर्थिक वर्षात मोठा वाढला असून तीन लाख 79 हजार 95 घरांची विक्री या आर्थिक वर्षात झाली आहे. विशेष म्हणजे मोठ्या आकाराची घरे या आर्थिक वर्षात अधिक विकली गेली आहेत आणि घरांच्या किमती देखील विशेष वाढलेल्या आहेत.
अर्थव्यवस्थेच्या भरारीत बांधकाम क्षेत्राचा वाटा वाढला
गेल्या काही वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आलेख देखील वाढला आहे. आता भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात आहे. विशेष म्हणजे 2035 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा अंदाज आहे.
तसेच 2050 पर्यंत आपली अर्थव्यवस्था जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा आशावाद अर्थशास्त्र विशारद लोकांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेत बांधकाम क्षेत्राचा वाटा देखील वाढत आहे आणि भविष्यात बांधकाम क्षेत्रात अनेक नवीन गुंतवणूक पर्याय देखील उपलब्ध होणार आहेत.