Best Place To Live In Pune : आयटी हब, शैक्षणिक संस्थांमुळे सर्वाधिक पसंती शिवाजीनगरमधून संपूर्ण राज्यभर चांगली कनेक्टिव्हिटी पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, विधी महाविद्यालय (लॉ कॉलेज), कृषी महाविद्यालय ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा ऐतिहासिक आणि नामांकित शैक्षणिक संस्था शिवाजीनगर भागात मोठ्या प्रमाणात आहेत.
तसेच, नामांकित खासगी कोचिंग क्लासेसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर जिल्हा पोलीस मुख्यालय, राज्य आणि केंद्र शासनाची प्रमुख कार्यालये असल्याने संपूर्ण शिवाजीनगर परिसराला मोठी मागणी आहे.
दळणवळणाची उत्तम सुविधा असल्याने बांधकाम व्यावसायिकांबरोबरच विद्यार्थी, नोकरदार आणि इतर व्यावसायिकांची मोठी पसंती मिळत आहे. परिणामी, या भागात रेडिरेकनरचे दर आणि फ्लॅटचे दर सर्वाधिक आहेत. मात्र, तरीही प्रथम पसंती या भागालाच मिळत आहे.
सेनापती बापट रस्ता आणि पुणे विद्यापीठ रस्त्यावर पंचतारांकित हॉटेल, मॉल आणि मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आल्याने रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या सर्वांमुळे अप्रत्यक्षरित्या रोजगाराच्या संधीही मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत.
तसेच, शैक्षणिक संस्थांमुळे विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या विद्यार्थ्यासाठी राहण्याची सोय तसेच चहा, नाष्टा, जेबण यासाठी हॉटेल आणि खानावळ सुरू झाल्या आहेत. जंगली महाराज रस्ता आणि शिवाजीनगरच्या काही भागात रेडिरेकनरचा दर हा वेगवेगळा आहे.
पुणे विद्यापीठ रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता, घोले रस्ता, आपटे रस्ता, लक्ष्मणराव काकासाहेब किर्लोस्कर (लकाकि) रस्ता, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, पांडवनगर, वडारवाडी, जनवाडी, गोखलेनगर, दीप बंगला चौक परिसर, भांडारकर रस्ता, बीएमसीसी रस्ता, कृषी महाविद्यालय परिसर,
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, सिंचननगर, जिल्हा न्यायालय परिसर, कामगार वसाहत आणि शिवाजीनगर गावठाण आदी भागात रेडिरेकनरचा दर वेगवेगळा आहे. या परिसरात साधारणपणे ८ हजार रुपये ते २५ हजार रुपयांचा दर आहे.
विकत घेण्यासाठी दर
- १ बीएचके – ५० लाख ते दीड कोटी रुपये
- २ बीएचके – एक कोटी रुपये ते ३ कोटी रुपये
- ३ बीएचके – ४ कोटी रुपये ते ८ कोटी रुपये
- बंगलो रो- हाऊसेस – ६ कोटी रुपये ते १२ कोटी रुपये
दरमहा भाड्याने घेण्यासाठी –
- १ बीएचके – २० हजार रुपये +
- २ बीएचके – ४५ हजार रुपये +
- ३ बीएचके – ६५ हजार रुपये +