Pune Real Estate : राज्याच्या विविध भागांतून पुणे शहरात कामाच्या निमित्ताने येणारे नोकरदार जवळच घर घेण्यासाठी प्राधान्य देत असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. परिणामी, ज्या भागात नोकऱ्या निर्माण होतात त्याच भागात घरांची संख्या आणि खरेदी- विक्रीही वाढत आहे.

मोठ्या रहिवासी टाऊनशिप, उत्तम पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा आणि कॉस्मोपॉलिटन वातावरणाच्या दृष्टीने पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाला लागून असलेल्या डेक्कन परिसराला सर्वाधिक पसंती आहे.

तसेच, डेक्कन जिमखाना क्रिकेट ग्राउंड, कार्पोरेट कार्यालय, पंचतारांकित हॉटेल, बाजारपेठ असल्याने आणि सक्षम पायाभूत सुविधा असल्याने राहणीमानाचा दर्जा पाहून नागरिकांची अधिक वर्दळ पाहायला मिळत आहे.

पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागांसह शहराच्या मध्यवर्ती भागांत अत्याधुनिक सुविधांचे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल एक लाख घरांहून अधिक सदनिकांची भर पडल्याचे बांधकाम क्षेत्रातील विविध सर्वेक्षणातून समोर आले आहे.

यामध्ये डेक्कन जिमखाना, एरंडवणा, मॉडेल कॉलनी, आपटे रस्ता, शिवाजीनगर, कोथरूड, कर्वेनगर, बारजे, कात्रज, हिंजवडी, औंध, बाणेर, बालेवाडी, खराडी, हडपसर, विमाननगर, कल्याणीनगर यांसह मुंढवा, कोंढवा या परिसराला ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे.

या सर्व भागांमध्ये अलीकडच्या काळात विविध माध्यमातून सर्वाधिक नोक-यांची निर्मिती झाली असल्याने या ठिकाणी नव्याने होणाऱ्या बांधकामांची आणि तेथे उपलब्ध होणाऱ्या सदनिकांची संख्या देखील वाढली आहे.

आयटी क्षेत्र, ऑटोमोवाइल क्षेत्र तसेच कार्पोरेटस कंपन्यांची कार्यालये, नामांकित हटिल आणि दुकानांमुळे या भागामध्ये खरेदी करण्यासाठी नोकरदार वर्ग उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या खिशाला परवडतील, अशा किमतीची घरे उपलब्ध होत असल्यानेही या भागांकडेच सध्या ओढा जास्त आहे.

पुण्यात घर भाड्याने घेण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी सर्वात जास्त मागणी असलेली ठिकाणे म्हणजे डेक्कन जिमखाना आहे. तसेच, लोकप्रिय भोजनालये, कफ, लाउंज, मॉल्स आणि हाय स्ट्रीट रिटेल, मनोरंजन क्षेत्रे आणि स्पोर्टस क्लबने गजबजलेले डेक्कन हे बहुतांश लोकांना आवडणारे निवासी ठिकाण बनले आहे.

त्याचबरोबर फरयुसन कॉलेज, मराठवाड़ा मित्र मंडळ कॉलेज, बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, गोखले इनिटट्यूटमध्ये राज्यासह देशभरातून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने त्यांच्यासाठी कॉट बेसिसपासून अत्याधुनिक सुविधा असलेल्या फ्लॅटची मागणी देखील जास्त आहे.

तसेच, जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या झाडांमुळे नितांत थंडावा अनुभवायला मिळतो. तर फर्ग्युसन रस्त्यावरील स्ट्रीट शॉपिंगसाठी तरुणाईचा मोठा ओढा नेहमी पाहायला मिळतो.

डेक्कन जिमखाना परिसरामध्ये रेडिरेकनरचा दर काय?

डेक्कन जिमखाना काही भागामध्ये रेडिरेकनरचा वर हा वेगवेगळा आहे. जंगली महाराज रस्ता, घोले रस्ता, आपटे रस्ता, फर्ग्यूसन कॉलेज रस्ता आदी भागात रेडिरेकनरचा दर वेगवेगळा आहे. साधारणपणे १०,००० रुपये ते २५,००० रुपयांपर्यंत दर आहेत.

अशा आहेत घरांच्या किमती
१ बीएचके                       ८० लाख ते सव्वा कोटी रुपये
२ बीएचके                      सव्वा कोटी रुपये ते ३ कोटी रुपये
३ बीएचके                     ३ कोटी रुपये ते ७ कोटी रुपये
४ बंगलो रो हाऊसेस    ५ कोटी रुपये ते १० कोटी रुपये

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *