Pune Rain News :- पुणे शहरात मान्सून सक्रिय असून, रविवारी (दि. २) दिवसभर पावसाच्या दमदार सरी पडल्या. सायंकाळपर्यंत पुणे शहरात ४ मि.मी. तर लोहगावमध्ये २ मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील सहा दिवस आकाश ढगाळ राहणार आहे. शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर घाटमाथ्यावर अतिवृष्टी व मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेले काही दिवस शहरात दमदार पाऊस पडत आहे. शहरात पाऊस उशिरा सुरू झाला असला तरी सरासरीच्या जवळपास पोहचण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. रविवारीही दिवसभर शहराच्या विविध भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सायंकाळपर्यंत पाषाणमध्ये ४५ मि.मी वडगावशेरी ४, कोरेगाव पार्क ३ व एनडीए व मगरपट्टामध्ये ०.५ मिमी इतका पावसाची नोंद झाली आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी सुरू होत्या.

रविवारी कमाल तापमान २८.६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस इतके होते. येत्या ३ ते ८ जुलैदरम्यान आकाश पूर्णतः ढगाळ राहणार आहे. याच दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर, घाटमाथ्यावर यलो अलर्ट असून, येथे अतिवृष्टी व मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यादरम्यान, कमाल तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *