Pune Railway Station : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. याशिवाय लोकसभा निवडणुका आणि लग्नसराईचा देखील सीजन चालू आहे. यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेसमध्ये, रेल्वे गाड्यांमध्ये आणि खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
या अतिरिक्त गर्दीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल्स कडून आर्थिक पिळवणूक देखील केली जात आहे. यामुळे ही अतिरिक्त गर्दी कमी व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून काही विशेष एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात आहेत.
अशातच, पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
ही गाडी पुणे ते बालासोर दरम्यान धावणार असून या गाडीला राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आता आपण पुणे ते बालासोर दरम्यान धावणाऱ्या या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार यासंदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे-बालासोर (ट्रेन क्र.०१४५१) ही सुपरफास्ट विशेष गाडी 18 मे 2024 ला Pune रेल्वे स्टेशन वरून सुटणार आहे. ही ट्रेन या दिवशी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी बालासोरला पोहोचणार आहे.
दुसरीकडे बालासोर-पुणे विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच गाडी क्रमांक 01452 ही विशेष गाडी 20 मे 2024 ला बालासोर रेल्वे स्टेशन वरून सकाळी नऊ वाजता रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री साडेसात वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चंपा, शक्ती, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, चकरधरपूर, टाटानगर, खरगपूर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.