Pune Railway News : रेल्वे हे प्रवासाचे एक महत्वाचे साधन आहे. भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे.
दुसरे म्हणजे रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जर प्रवास करायचा असेल तर रेल्वेने सहजतेने जाता येते.
दरम्यान, रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांसाठी नेहमीच वेगवेगळे निर्णय घेतले जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जातात. पुणे ते अमरावती या दरम्यानही रेल्वेच्या माध्यमातून द्विसाप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जात आहे.
या मार्गावर वाढलेली गर्दी लक्षात घेता ही एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पुण्याहून धावणाऱ्या याच विशेष एक्सप्रेस ट्रेन संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
या विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विशेष एक्सप्रेस गाडी आता मार्च अखेरपर्यंत चालवली जाणार आहे.
पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस गाडी ३१ मार्च २०२४ पर्यंत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी दर शुक्रवारी व रविवारी पुणे स्थानकावरून सुटणार आहे.
रात्री १०.५० वाजता पुणे रेल्वे स्टेशन वरून ही गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. तसेच अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस गाडी १ मार्च २०२४ पर्यंत चालवली जाणार आहे.
ही गाडी या कालावधीत शनिवारी व सोमवारी अमरावती स्थानकावरून सुटणार आहे. ही गाडी सायंकाळी ७.५० वाजता अमरावती रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 4 वाजून 20 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावर येणार आहे.
यामुळे पुणे ते अमरावती दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. खरंतर पुण्याहून विदर्भात आणि विदर्भातून पुण्यात येणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता या विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.