Pune Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने आणि कोणत्याही शहरात रेल्वेने सहजतेने जाता येणे शक्य असल्याने या प्रवासाला विशेष प्राधान्य दिले जाते.

भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही शहरात जायचे असेल तर रेल्वे उपलब्ध होते.

परिणामी अनेकजण प्रवासासाठी रेल्वेलाच पसंती दाखवतात. दरम्यान पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे बंद झालेली पुणे-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस 16 जानेवारी 2024 पासून पुन्हा एकदा रुळांवर धावणार आहे.

खरे तर, उत्तर मध्य रेल्वे, आग्रा विभागाच्या मथुरा स्थानकावर सुरू असलेल्या यार्ड रीमॉडेलिंगच्या कामामुळे भोपाळ विभागातून जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या यामध्ये पुणे ते हजरत निजामुद्दीन दरम्यान सुरू असणारी एक्सप्रेस देखील करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान हे रिमोल्डिंगचे काम आता पूर्ण झाले असून काही गाड्यांची सेवा त्यांच्या मूळ स्थानकांवरून वेळापत्रकानुसार पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये सहा गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये हजरत निजामुद्दीन ते पुणे आणि पुणे ते हजरत निजामुद्दीन या एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १२१४८ हजरत निजामुद्दीन-कोल्हापूर एक्स्प्रेस ११ जानेवारीला, ट्रेन १२२६४ हजरत निजामुद्दीन-पुणे एक्सप्रेस ११ जानेवारीला, ट्रेन १२२६३ पुणे-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस १६ जानेवारी आणि १९ जानेवारी आणि ट्रेन १२४९४ हजरत निजामुद्दीन-मिरज एक्स्प्रेस 11 जानेवारीला नियोजित वेळापत्रकानुसार गंतव्यस्थानाकडे धावणार आहे.

मात्र ट्रेन क्रमांक 12147 कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस 16 जानेवारीला आणि ट्रेन 11077 पुणे-जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस 10 आणि 11 जानेवारीला त्यांच्या मूळ स्थानकांवरून सुटतील आणि आग्रा कॅंट-मितावली-गाझियाबाद-एन दिल्ली मार्गे वळवलेल्या मार्गाने त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचणार आहेत. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *