Pune Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने पुणे विभागात लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी स्पेशल ब्लॉक घेतला आहे.

हा ब्लॉक पुणे-मिरज मार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे या स्थानकादरम्यान घेतला गेला आहे. यामुळे 22 फेब्रुवारी पर्यंत या रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

दरम्यान आज आपण या ब्लॉकमुळे कोणत्या रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलेला आहे हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

कोणत्या गाड्यां रद्द राहणार

1) 20 आणि 21 फेब्रुवारीला कोल्हापूर-पुणे एक्सप्रेस रद्द होणार आहे

2) 21 आणि 23 फेब्रुवारीला पुणे कोल्हापूर एक्सप्रेस रद्द राहणार आहे.

3) 22 फेब्रुवारीला अप आणि डाऊन मार्गावरील मुंबई- कोल्हापूर कोयना एक्सप्रेस रद्द राहणार आहे.

4) 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर ते सातारा दरम्यान धावणारी गाडी फक्त कराड पर्यंत धावणार आहे.

5) सातारा ते कोल्हापूर दरम्यान धावणारी गाडी 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी सातारा ऐवजी कराड येथून सुटणार आहे.

6) 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी पुणे-कोल्हापूर एक्सप्रेस फक्त सातारा पर्यंत धावणार आहे.

7) 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर-पुणे एक्सप्रेस सातारा येथून सुटणार आहे.

8) 21 फेब्रुवारीला गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यापर्यंतच धावणार आहे.

9) 22 फेब्रुवारीला कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यातून सुटणार आहे.

म्हणजेच या ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द राहतील तर काही अंशतः रद्द राहतील. दुसरीकडे या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहेत.

याबाबत मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारीला धावणारी हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर एक्सप्रेस दौंड-कुर्डुवाडी-पंढरपूर-मिरज या वळवलेल्या मार्गाने चालवली जाणार आहे. ही गाडी या ब्लॉकमुळे पुण्याला येणार नाही.

दुसरीकडे, बंगळुरू-जोधपूर एक्सप्रेस गाडी २१ फेब्रुवारीला मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-दौंड-पुणे या वळवलेल्या मार्गावर धावणार आहे. म्हणजे ही गाडी सांगली, कराड आणि सातारा या रेल्वेस्थानकावरून या दिवशी धावणार नाही.

याशिवाय काही गाड्या विलंबाने देखील धावणार आहेत. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *