Pune Railway News : रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आपल्या देशात खूपच अधिक आहे. दरम्यान पुणे लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे पुणे ते लोणावळा दरम्यान, आता दुपारच्या वेळी देखील लोकल धावण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रामुख्याने दुपारी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास यामुळे अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरून दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी लोणावळ्याकडे लोकल सुटणार आहे आणि लोणावळ्यात ही लोकल 1 वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार आहे.
तसेच ही लोकल लोणावळा येथून साडेअकरा वाजता सुटणार आहे आणि पाऊण वाजता शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
खरे तर या मार्गावर दुपारी लोकल धावत नव्हती यामुळे प्रवाशांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत होता. आता मात्र प्रवाशांची ही अडचण कायमची दूर होणार आहे.
याशिवाय आज महाराष्ट्रातून धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना पुण्यातील लोणावळा आणि कर्जत या रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते चेन्नई एग्मोर या एक्स्प्रेसला लोणावळा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते भुवनेश्वर या कोनार्क एक्स्प्रेसला कर्जत स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
त्यामुळे लोणावळा आणि कर्जत रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा यावेळी व्यक्त केली जात आहे.
लोणावळा आणि कर्जत मधील रेल्वे प्रवाशांना आता जलद गतीने राजधानी मुंबईकडील प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांच्या माध्यमातून रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.