Pune Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक जण आपल्या मूळ गावी परतत आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचा देखील काळ सुरू आहे. यामुळे आपल्या मूळ गावी मतदानासाठी तथा उन्हाळी सुट्ट्या घालवण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याशिवाय पर्यटनासाठी देखील मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत.
यामुळे प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दी होत आहे. महाराष्ट्रात देखील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये, खाजगी ट्रॅव्हल्समध्ये आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान रेल्वे प्रवाशाची अतिरिक्त गर्दी पाहता प्रशासनाच्या माध्यमातून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत.
पुणे ते अयोध्या दरम्यान देखील विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जात आहे. खरे तर 22 जानेवारीला अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. या भव्य मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
पुण्यातील ही मोठ्या प्रमाणात भाविक श्रीक्षेत्र अयोध्याला दर्शनासाठी जात आहेत. दरम्यान पुणे ते आयोध्या या मार्गावर होत असलेली अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने या दोन्ही शहरा दरम्यान उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे या उन्हाळी विशेष गाडीला मिळत असलेला प्रतिसाद पाहता आता या गाडीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. या विशेष गाडीला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुण्यातून उत्तर प्रदेशला आणि उत्तर प्रदेश मधून पुण्याला येणाऱ्यांना या गाडीचा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनला किती दिवसांची मुदत वाढ मिळाली आहे या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
समर स्पेशल ट्रेनला किती दिवसांची मुदत वाढ
रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे-अयोध्या समर स्पेशल ट्रेन (गाडी क्र. ०१४५५) 7 मे 2024 पर्यंत धावणार होती. मात्र या गाडीला मिळत असलेला प्रतिसाद पाहता आता ही गाडी 31 मे पर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता ही गाडी 31 मे पर्यंत पुणे रेल्वे स्टेशन वरून प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी चालवली जाणार आहे. तसेच अयोध्या-पुणे समर स्पेशल ट्रेन (गाडी क्र. ०९४५६) 9 मे मेपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र या देखील गाडीला मुदतवाढ मिळाली असून आता ही गाडी दोन जून पर्यंत धावणार आहे. या कालावधीत ही गाडी अयोध्या रेल्वे स्थानकावरून प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी सोडली जाणार आहे.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
पुणे ते अयोध्या दरम्यान सुरू करण्यात आलेली समरस पेशल ट्रेन या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. ही गाडी राज्यातील चिंचवड, लोणावळा, पानेवल, कल्याण, इगतपुरी, मनमाड, जळगाव, भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.