Pune Railway News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी पुण्यातील रामभक्तांसाठी विशेष महत्त्वाची राहणार आहे. खरे तर 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री क्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले आहे.
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर हे मंदिर रामभक्तांसाठी सुरू करण्यात आले आहे. 23 जानेवारीपासून अयोध्या येथील भव्य राम मंदिर राम भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.
दरम्यान 500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रामराया भव्य मंदिरात विराजमान झाले असल्याने देशातील कानाकोपऱ्यातील रामभक्त आता अयोध्या नगरीत दाखल होऊ लागले आहेत. श्री क्षेत्र अयोध्या येथे दाखल होणाऱ्या राम भक्तांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.
विशेष म्हणजे राम भक्तांसाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या शहरांमधून विशेष एक्सप्रेस गाड्या देखील चालवल्या जात आहेत.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर पुणे येथून देखील अयोध्यासाठी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
पुण्यातील राम भक्तांना सहजतेने अयोध्या येथील मंदिरात जाऊन दर्शन घेता यावे यासाठी या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. खरे तर या गाड्या 30 जानेवारी 2024 पासून सुरु होणार होत्या.
पुण्याहून श्रीक्षेत्र अयोध्या साठी 15 गाड्या चालवल्या जाणार आहेत. मात्र, जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या विशेष गाड्यांचे वेळापत्रक आता बदलणार आहे.
हे वेळापत्रक आता पुढे ढकलले जाईल असे बोलले जात आहे. यामुळे पुण्यातील राम भक्तांचा मोठा हिरमोड होणार आहे. अयोध्या येथे दररोज लाखो भाविक दाखल होत आहे.
यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. हेच कारण आहे की, आता हे वेळापत्रक पुढे ढकलले जाणार आहे. पण, या गाड्यांचे सुधारित वेळापत्रक कसे राहणार याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली आहे.
यामुळे आता प्रत्येकी दीड हजार प्रवासी क्षमता असलेल्या या गाड्यांच सुधारित वेळापत्रक कसे राहणार याकडे पुण्यातील रामभक्तांचे विशेष लक्ष राहणार आहे.