Pune Railway News : चार ते पाच शतकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभू श्रीरामजीचे भव्य दिव्य राम मंदिर तयार होत आहे. भव्य-दिव्य राम मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. विशेष म्हणजे येत्या 22 जानेवारीला या राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे.
यामुळे सध्या संपूर्ण भारतभर राममय वातावरण पाहायला मिळत आहे. प्रभू श्रीराम अयोध्येत भव्य मंदिरात विराजमान होणार यामुळे संपूर्ण जगातील रामभक्तांमध्ये आनंदाची लहर आली आहे.
श्रीक्षेत्र आयोध्या येथे विकसित झालेले हे भव्य-दिव्य राम मंदिर रामभक्तांसाठी 23 जानेवारीपासून दर्शनासाठी सुरू केले जाईल अशी शक्यता आहे.
अशा परिस्थितीत श्रीक्षेत्र आयोध्या येथे लाखो-करोडो रामभक्त दर्शनासाठी दाखल होणार आहेत. पुण्यातूनही लाखो संख्येने नागरिक अयोध्येत दर्शनासाठी जाणार आहेत.
दरम्यान पुण्यातील भाविकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे श्रीक्षेत्र आयोध्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
त्यामुळे पुणेकरांचा आयोध्याकडील प्रवास जलद होणार असून राम भक्तांना आयोध्याला जाणे सोयीचे होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 30 जानेवारी 2024 पासून पुणे ते आयोध्या दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
30 जानेवारीपासून पंधरा विशेष गाड्या या मार्गावर चालवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने आखले आहे. दर दोन दिवसांनी पुणे येथून अयोध्यासाठी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
यामुळे पुण्यातील भाविकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही. या विशेष एक्सप्रेस ट्रेन बाबत बोलायचं झालं तर या सर्व गाड्या स्लीपर कोच राहणार आहेत.
एका गाडीतून 1,500 पॅसेंजर प्रवास करू शकणार आहेत. विशेष म्हणजे या गाडींसाठी लवकरच बुकिंग सुरू होणार अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे ते आयोध्या दरम्यान सुरू होणाऱ्या विशेष गाडीला कसा प्रतिसाद मिळणार यावरच या गाड्यांच्या संख्या वाढवण्यावर निर्णय घेतला जाणार आहे.