Pune Railway News : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. सेंट्रल रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणाऱ्या अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही विशेष गाड्या चालवण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचा पुण्यासहित राज्यातील अनेक भागातील रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे. खरे तर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की रेल्वे गाड्या हाउसफुल होतात.

विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळते. यंदा देखील अशीच परिस्थिती तयार होत असून याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुणे ते दानापूर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे ते दानापूर यादरम्यान विशेष गाड्यांच्या 14 फेऱ्या होणार आहेत. दरम्यान आता आपण या समर विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि स्टॉपेज याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं राहणार पुणे-दानापूर विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक अन थांबे

मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, गाडी क्र. 01415 ही ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावरून 20, 24 आणि 28 एप्रिल ला सोडली जाणार आहे. या दिवशी ही गाडी पुण्यावरून सायंकाळी 7:55 वाजता सुटणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पहाटे साडे चार वाजता दानापूरला पोहोचणार आहे. तसेच गाडी क्र.01416 ही ट्रेन 22 एप्रिल, 26 एप्रिल आणि 30 एप्रिल ला दानापूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.

ही गाडी दानापूर येथून सकाळी साडेसहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून 35 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. याशिवाय गाडी क्र. 01417 ही गाडी 18 एप्रिल, 21 एप्रिल, 25 एप्रिल आणि 29 एप्रिल ला पुणे रेल्वे स्थानकावरून दानापूरला सोडली जाणार आहे.

हे चार दिवस ही विशेष गाडी सकाळी साडेसहा वाजता पुण्यावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता दानापुरला पोहोचणार आहे. तसेच गाडी क्र. 01418 ही ट्रेन 19 एप्रिल, 22 एप्रिल, 26 एप्रिल, 30 एप्रिलला दानापूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. ही गाडी या दिवशी दुपारी 1.30 वाजता दानापूर येथून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी पावणे आठ वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

गाडी क्रमांक 1415 आणि 1416 या विशेष एक्सप्रेस गाड्या या रेल्वे मार्ग दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

तसेच गाडी क्रमांक 1417 आणि 1418 या विशेष एक्सप्रेस गाड्या हडपसर, दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *