Pune Railway News : येत्या दहा तारखेला अक्षय तृतीयाचा मोठा सण येतोय. त्यामुळे संपूर्ण राज्यभर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान या सणासुदीच्या काळात पुणे आणि अहमदनगर मध्ये रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
सध्या उन्हाळी सुट्ट्या, लोकसभा निवडणूक, लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम चालु आहे. त्यामुळे देशभरातील रेल्वे मार्गांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे गाड्या हाउसफुल होत आहेत.
रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी पाहता प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त रेल्वे सोडल्या जात आहेत. अशातच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता पुणे ते मुजफ्फरपुर दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार या विशेष गाडीच्या पुणे ते मुजफ्फरपुर अशा नऊ आणि मुजफ्फरपुर ते पुणे अशा नऊ अशा एकूण 18 फेऱ्या होणार आहेत. यामुळे पुणे, अहमदनगर सहित या मार्गावरील विविध रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुणे- मुझफ्फरपूर सुपरफास्ट एसी विशेष रेल्वे (ट्रेन क्रमांक 05290) ही गाडी 6 मे ते 1 जुलै या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी दर सोमवारी पुणे रेल्वे स्टेशन वरून सकाळी साडेसहा वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मुझफ्फरपूरला दुपारी सव्वा तीन वाजता पोहोचणार आहे.
तसेच मुझफ्फरपूर – पुणे सुपरफास्ट एसी विशेष रेल्वे (गाडी क्रमांक 05289) ही ट्रेन 4 मे ते 29 जून या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी प्रत्येक शनिवारी मुझफ्फरपूर येथून रात्री सव्वा नऊ वाजता सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 5.35 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना सणासुदीच्या काळात आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठा फायदा होणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
ही गाडी राज्यातील सात महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. ही समर स्पेशल ट्रेन या मार्गावरील हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ या राज्यातील सात महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे.