Pune Railway News : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुण्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावाकडे जात असतात. यंदा देखील उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याने हजारो नागरिक आपल्या गावाकडे जात आहेत.
यामुळे रेल्वे गाड्या सध्या हाउसफुल पाहायला मिळत आहेत. या अतिरिक्त गर्दीमुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. अतिरिक्त गर्दी होण्याचे कारण म्हणजे सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत, लग्नाचा सीझन आहे शिवाय सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे.
यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान प्रवाशांची हीच अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासन आणि पुणे ते ओडिशा राज्यातील संबळपूर या रेल्वे स्थानकादरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचे जाहीर केले आहे.
ही एक्सप्रेस ट्रेन कालपासून सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस गाडीचे वेळापत्रक जाणून घेणार आहोत. तसेच ही गाडी महाराष्ट्रातील कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार हे देखील पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
मध्य रेल्वेने पुणे ते संबळपूर दरम्यान उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे संबळपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडी (ट्रेन क्रमांक ०८३२७) १४ एप्रिल ते ३० जून २०२४ या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी दर रविवारी संबळपूर येथून २२.०० वाजता सुटणार आहे आणि तिसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. दुसरीकडे ट्रेन क्रमांक ०८३२८ ही गाडी १६ एप्रिल ते २ जुलै २०२४ या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी दर मंगळवारी पुणे येथून ०९.१५ वाजता सुटणार आहे आणि संबळपूर येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचणार आहे. मध्य रेल्वे या मार्गावर आठवड्यातून एकदा ही विशेष गाडी चालवणार आहे. त्यामुळे पुण्याहून ओडिषाकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही गाडी महाराष्ट्रातील गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगांव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइन या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
अर्थातच या गाडीमुळे उत्तर महाराष्ट्र तथा विदर्भातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील नागरिकांना या गाडीमुळे पुण्याकडे जलद गतीने जाता येणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रणात येणार आहे.