Pune Railway News : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. येत्या 11 ते 12 दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढण्याची शक्यता आहे, म्हणून प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विशेष एक्सप्रेस गाड्या चालवणार आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी गर्दी पाहता पुण्यातून देखील एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोडली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे विभागाच्या माध्यमातून पुणे – मुजफ्फरपूर दरम्यान विशेष एसी एक्सप्रेस गाडी चालवली जाणार आहे. यामुळे पुण्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेषतः उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना या विशेष एक्सप्रेस ट्रेन मुळे मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास जलद आणि गतिमान होईल अशी आशा आहे.
अशा परिस्थितीत आता आपण या विशेष एसी एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
केव्हा सुरु होणार ही गाडी
ही विशेष एसी एक्सप्रेस ट्रेन नियमित चालवली जाणार नाही. ही गाडी 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान चालवली जाणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पुणे ते मुजफ्फुरदरम्यान चालवली जाणारी विशेष एक्सप्रेस ट्रेन 21 डिसेंबर आणि 28 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि दोन दिवसानंतर मुजफ्फरपुर येथे सकाळी सहा वाजता पोहोचणार आहे.
तसेच मुजफ्फरपूर ते पुणे विशेष एसी एक्सप्रेस ट्रेन 20 डिसेंबरला आणि 27 डिसेंबरला दुपारी एक वाजता मुजफ्फरपुर येथून रवाना होणार आहे आणि दोन दिवसानंतर रात्री नऊ वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कुठं थांबणार ही गाडी
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही विशेष अशी एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा , दानापुर, पाटलीपुत्र आणि हाजीपुर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती समोर आली आहे.