Pune Railway News :- महाराष्ट्र मध्ये अनेक नवीन रेल्वे सुरू करण्यात येत असून या माध्यमातून अनेक महत्त्वाचे शहरे जोडली जाणार आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यासोबतच वंदे भारत एक्सप्रेस देखील महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या असून सध्या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन मार्गांवर वंदे भारत धावत आहे.
तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखी काही मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याचे शक्यता आहे. अशाप्रकारे महत्वाच्या असलेल्या पुणे ते कोल्हापूर या रेल्वे मार्गावर देखील आता पुणे ते मिरज सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू होणार असून या एक्सप्रेस विषयीच एक महत्वाचे अपडेट सध्या समोर आलेली आहे.
थांबा मिळावा म्हणून निरा ग्रामस्थांनी केले होते आंदोलन
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की पुणे ते मिरज अशी सुपरफास्ट एक्सप्रेस नवीन सुरू होणार असून या एक्सप्रेसला निरा या ठिकाणी थांबा देण्यात आलेला नव्हता. याकरिता निरा ग्रामस्थांनी या एक्सप्रेसला निरा या ठिकाणी थांबा मिळावा याकरिता रेल रोको चा इशारा दिलेला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने याला प्रतिसाद देखील दिला होता.
परंतु कुठल्याही प्रकारचा रेल रोको न करताच या आंदोलनाला यश मिळाले आहे. या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिली तर चार जून रोजी म्हणजेच रविवारी निरा येथील ग्रामपंचायत सदस्य व निरा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद काकडे, बाळासाहेब साळुंखे हे व इतर प्रमुख व्यक्तींनी निरा रेल्वे स्टेशनचे प्रमुख महेश मीना यांना याबाबत असलेल्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर निवेदन देखील दिले होते. त्यामुळे सोमवारी पुणे रेल्वे डिव्हिजनचे अप्पर रेल प्रबंधक बि.के. सिंग व काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या प्रमुख आंदोलकांशी चर्चा करत या प्रश्नावर सकारात्मकता दाखवली. तसेच पुढच्या आठवड्यापासून पुणे ते मिरज सुपरफास्ट एक्सप्रेस नीरा स्टेशनवर थांबवण्याचे देखील आश्वासन या माध्यमातून देण्यात आले. एवढेच नाहीतर मंगळवारी रेल्वे अधिकारी सिंग यांच्या सूचनेनुसार काही कालावधी करिता ही सुपरफास्ट एक्सप्रेस थांबवण्यात आलेली होती.
पुणे- मिरज सुपरफास्ट एक्सप्रेसचे वेळापत्रक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून पुणे ते कोल्हापूर या मार्गावर पुणे ते मिरज सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे गाडी रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. दर मंगळवारी ही गाडी या लोहमार्गावरून धावणार असून ही पुणे या ठिकाणी सकाळी आठ वाजता सुटेल व जेजुरी येथे आठ वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल.
तसेच लोणंद, सातारा, कराड आणि सांगली या ठिकाणी थांबून ही गाडी दुपारी एक वाजून 45 मिनिटांनी मिरजला पोहोचून पुन्हा परतीचा प्रवास सुरू करणार आहे. परतीच्या प्रवासामध्ये सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी जेजुरीत तर सात वाजता पुणे येथे पोहोचणार आहे