Pune Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. शिवाय लग्नसराई आणि निवडणुकीचा हंगाम आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या मूळ गावी परतत आहेत. एवढेच नाही तर उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याने आता अनेकजण आपल्या परिवारासमवेत सहलीला जात आहेत. यामुळे पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहेत.
रेल्वे स्थानकावर देखील मोठी गर्दी पाहायला मिळत असून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून काही उन्हाळी विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने पुण्यातील नागरिकांसाठी देखील काही विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.
पुणे ते अजनी दरम्यान देखील एकेरी विशेष गाडी चालवली जाणार आहे. यामुळे या गाडीचा विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुण्याहून विदर्भाला जाणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा फायदा होणार असे बोलले जात आहे.
दरम्यान आता आपण पुणे ते अजनी दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या एकेरी विशेष गाडीचे वेळापत्रक अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार पुणे ते अजनी ट्रेनचे वेळापत्रक?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे पुणे ते अजनीदरम्यान अतिरिक्त एकेरी उन्हाळी विशेष गाडी चालवणार आहे. ही गाडी उद्या अर्थातच दोन मे 2024 ला चालवली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही उन्हाळी विशेष गाडी 2 मे 2024 ला पुणे रेल्वे स्थानकावरून मध्यरात्री १२.२० वाजता सोडली जाणार आहे. ही गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणारा आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता अजनीला पोहोचणार आहे.
या एकेरी विशेष गाडीला कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
पुणे ते अयोध्या दरम्यान रेल्वेच्या चार फेऱ्या होणार
रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पुणे ते अयोध्या दरम्यान चार विशेष गाड्या चालवल्या जाणार आहे. पुणे-अयोध्या विशेष एक्सप्रेस ट्रेन 2 मे आणि 7 मे रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून सायंकाळी साडे सात वाजता सुटणार आहे आणि तिसऱ्या दिवशी अयोध्येत सकाळी ८.५० वाजता पोहोचणार अशी माहिती देण्यात आली आहे.
तसेच, अयोध्या-पुणे उन्हाळी विशेष गाडी अयोध्येहून 5 मे आणि 9 मे रोजी दुपारी चार वाजता सोडली जाणार आहे आणि ही ट्रेन तिसऱ्या दिवशी पुण्यात दुपारी ३.५५ वाजता पोहोचणार आहे.