Pune Railway Jobs : नववर्ष सुरू होण्याआधीच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.

ही बातमी दहावी आणि ITI उत्तीर्ण तरुणांसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की, दहावीनंतर आयटीआय केलेल्या उमेदवारांना पश्चिम मध्ये रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

पश्चिम मध्ये रेल्वेने तब्बल 3,000 जागांसाठी एका मेगा भरतीचे आयोजन केले आहे. या पदभरती अंतर्गत ट्रेड अप्रेंटिसशिप या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

विशेष बाब म्हणजे पश्चिम रेल्वेने या भरतीबाबत सविस्तर अधिसूचना जारी केली आहे. तसेच यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले गेले आहे.

जर तुम्हालाही रेल्वेत नोकरी करायची इच्छा असेल तर निश्चितच ही बातमी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान आता आपण या पदभरती बाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.

कोणत्या पदांसाठी निघाली भरती

पश्चिम मध्य रेल्वेच्या माध्यमातून ट्रेड अप्रेंटीशीप पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत तब्बल 3 हजार 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता अन वयोमर्यादा 

यासाठी दहावी तसेच आयटीआय उत्तीर्ण उमेदवार पात्र राहणार आहेत. या भरतीसाठी किमान 15 आणि कमाल 24 वर्ष वयाचे उमेदवार पात्र राहणार आहेत. तथापि नियमानुसार रिझर्व कॅटेगिरी मधील उमेदवारांना वयोमर्यादित सूट दिली जाणार आहे.

निवड कशी होणार

दहावी मध्ये आणि आयटीआय मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज कसा करायचा आहे

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. https://www.wcr.indianrailways.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. वेबसाईटवर About Us या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, Recruitment या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मग Railway Recruitment Cell येथे क्लिक करायचे आहे. मग Engagement of Act Apprentices for 2023-24 यावर जाऊन तुम्हाला या भरतीसाठी अर्ज सादर करता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 14 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *