Pune Property News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे स्वप्न आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेले असेल. तुमचेही असेच स्वप्न आहे का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. खरंतर, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळख प्राप्त पुण्यात अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
यामुळे अनेकांनी पुण्यात स्वस्त घर कुठे मिळणार हा सवाल उपस्थित केला होता. अशा परिस्थितीत आज आपण अशा काही भागांची माहिती पाहणार आहोत जिथे सर्वसामान्यांना त्यांच्या बजेटमध्ये फ्लॅट उपलब्ध होणार आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
खराडी, मांजरी : हा परिसर निवासी प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. कारण की हा भाग अजूनही डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. तथापि या ठिकाणी नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. राहण्यासाठी हा एक उत्कृष्ट परिसर म्हणून नावारूपाला येऊ लागला आहे.
या ठिकाणी तुम्ही राहण्यासाठी तसेच गुंतवणुकीसाठी निवासी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. मीडिया रिपोर्टनुसार येथे 1 बीएचके फ्लॅटची किंमत सरासरी 38 ते 45 लाख रुपयांच्या घरात आहे तसेच या ठिकाणी जर तुम्हाला 2 बीएचके फ्लॅट हवा असेल तर तुम्हाला यासाठी 56 लाखांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंतची मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.
शिरगांव : शिरगाव हे तळेगाव दाभाडे पासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलेले आहे. येथेही गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने विकास झाला आहे. विशेष म्हणजे आगामी काळात हा देखील भाग पूर्णपणे विकसित होईल आणि येथेही निवासी प्रॉपर्टीच्या किमती आकाशाला गवसणी घालण्याची शक्यता आहे.
जाणकार लोकांनी हा परिसर निवासी प्रॉपर्टीत गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतो असा आशावाद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे हा भाग राहण्यासाठी खूपच निवांत आहे. येथे 1 बीएचके फ्लॅटची किंमत 27 लाख रुपयांपर्यंत जाते आणि 2 बीएचके फ्लॅट ची किंमत 34 ते 37 लाख रुपयांच्या घरात जाते.
कोंढवा बुद्रुक : हा पुण्याजवळील आणखी एक वेगाने विकसित होत असलेला परिसर आहे. गेल्या काही वर्षात इथे देखील मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होईल आणि प्रॉपर्टी चे भाव गगनाला भेटतील अशी शक्यता आहे. परिणामी रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा भाग फायदेशीर ठरेल असे काही लोकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे येथून कात्रज, हडपसर आणि पुणे कॅम्प येथे जाणे खूपच सोयीचे आहे. या भागाला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. निश्चितच हा भाग पुण्याच्या बाहेर आहे मात्र आगामी काळात येथेही मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होईल आणि डेव्हलपमेंट वाढल्यानंतर पुणे आणखी जवळ येईल यात शंकाच नाही. येथे वन बीएचके फ्लॅट ची किंमत 32 ते 37 लाख रुपयांच्या घरात आहे आणि टू बीएचके घरांची किंमत 43 ते 55 लाख रुपयांच्या घरात आहे.
वाघोली : वाघोली हा देखील जलद गतीने डेव्हलप होत असलेला परिसर आहे. या परिसराची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथे तुम्हाला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळते. आयटी पार्क, विमानतळ आणि पोलीस स्टेशन येथून अगदी हाकेच्या अंतरावर बसलेले आहे. यामुळे हा देखील परिसर तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकतो.
तुम्हाला उत्तम परताव्यासाठी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी गुंतवणूक करू शकता आणि जर तुम्हाला येथे राहायला यायचे असेल तरीदेखील तुमच्यासाठी हा परिसर फायदेशीर ठरणार आहे. वाघोली मध्ये वन बीएचके फ्लॅट ची किंमत 27 लाख रुपयांच्या आसपास असल्याची माहिती समोर आली आहे आणि येथे टू बीएचके फ्लॅट ची किंमत 38 लाखांपासून ते 41 लाखांपर्यंत जाते असे सांगितलं जात आहे.