Pune Real Estate News : पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि मध्य महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यापारी केंद्र. पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते हे जरी शाश्वत सत्य असले तरीदेखील पुणे शहराला फार पूर्वापारापासून व्यापारी केंद्र म्हणूनही ओळखले जाते. अलीकडे पेशवे काळातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या पुण्यात विविध आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे शहराचा वेगाने विकास होत आहे.

शहर दिवसेंदिवस विस्तारू पाहत आहे. यामुळे रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणारे अनेक गुंतवणूकदार शहराकडे आकृष्ट झाले आहेत. गुंतवणूकदारांनी शहराच्या बाह्य परिसरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांनी विविध मोठमोठे प्रकल्प विकसित केली आहेत. ही शहराच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक बाब आहे. यामुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाचे महत्त्व कमी झाले आहे असे नाही.

तर आजही शहरातील मध्यवर्ती भागाचे विशेषता पेठांचे महत्त्व कायम आहे. पेठांमध्ये अगदी पेशवेकाळापासून मोठा व्यापारीवर्ग आपला व्यापार चालवत आहे. कपडे चपला भांडे दागिने सर्व काही पेठात उपलब्ध आहे. त्यासाठी मोठमोठे व्यापारी पेठात आहेत. याच कारणामुळे व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा भाग महत्त्वाचा बनतो. दरम्यान आज आपण व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी पुण्यातील पेठा का सर्वश्रेष्ठ आहेत? यातील गुंतवणुकीचा फायदा काय होऊ शकतो? याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पुण्यातील पेठांचे महत्त्व?
असं सांगितलं जातं की, पुण्यातील पेठा या पेशवे काळात बसवल्या गेल्या आहेत. 16व्या ते 17व्या शतकाच्या काळात पेठा बसवल्या गेल्यात. साहजिकच पेठांना अनेक शतकांचा इतिहास आहे. तेव्हापासूनच पेठा व्यापारासाठी विशेष ओळखल्या जातात. अलीकडे व्यापारी वर्ग येथे व्यापारासाठी विशेष इंटरेस्टेड बनला आहे. शिक्षणासाठी जगात किती प्राप्त बनलेल्या पुण्यात व्यापाराने कसे पाय पसरवले आहेत याचे उत्तम उदाहरण पेठांमधून समोर येत. पुण्याच्या व्यापारी इतिहासाची पेठा साक्ष आहेत. कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड परिसर हा पारंपारिक पेठाचा भाग म्हणून ओळखला जातो.

या भागात एका किलोमीटरच्या अंतरात जवळपास 500 हून अधिक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. यात 75 टक्के दुकानी या कपड्यांच्या आहेत तर पंधरा टक्के दागिन्यांच्या. यामध्ये अनेक घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांची दुकाने आहेत. पिटर इंग्लंड, तनिष्क, मालाबार गोल्ड यांसारख्या ब्रँडच्या वस्तूंची खरेदी देखील तुम्ही पेठांमध्ये अगदी सहजतेने करू शकता. सांगायचं तात्पर्य एवढंच की पेठांमध्ये नॉन ब्रांडेड ते ब्रँडेड अशा सर्व वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

अर्थातच पेठांमधील कस्टमर हे कुण्या एका वर्गाचे नाही. मध्यमवर्गीयपासून उच्चभ्रू समाजातील लोक पेठांमध्ये शॉपिंगसाठी येतात. अलीकडे शहरात विविध मॉल तयार झालेत. मात्र आजही पुण्यातील गिराहिक लग्नसराई , सण किंवा इतर छोटा मोठा कार्यक्रम असला तर पेठांमध्ये शॉपिंग करण्यास अधिक पसंती दाखवतात. याचा प्रमुख कारण म्हणजे वर्षानुवर्षापासून व्यापारी आणि ग्राहक यामध्ये ऋणानुबंध जोपासले गेले आहेत.

रिलेशन बॉण्डिंग आपण ज्याला म्हणतो ती पेठांच्या बाजारात व्यापारी आणि कस्टमर मध्ये पाहायला मिळते. तुळशीबाग आप्पा बळवंत चौक इत्यादी भागात कायमच वर्दळ पाहायला मिळते. हे कारण पुण्यातील पेठांना व्यापाराच्या दृष्टीने अति महत्त्वाचे बनवते. एकंदरीत पुण्यातील पेठा व्यापारी केंद्र म्हणून फार पूर्वीपासूनच आपला पाय रोवून बसल्या आहेत.

पेठाची इतर शहरातील ग्राहकांना देखील भुरळ
पेठात एकाच छताखाली विविध दुकाने आढळतात. त्यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ करावी लागत नाही. हेच कारण आहे की पुणेकर या पेठात जाऊन खरेदी करतात. पुण्याव्यतिरिक्त येथे अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागातील खरेदीदार देखील खरेदी करण्यासाठी येत असतात. यामुळे येथे वाहतुकीची सुविधा देखील फार पूर्वीपासूनच उत्तम आहे. पुण्याततील कोणत्याही भागातून या ठिकाणी सहजतेने पोहचता येत आहे.

दरम्यान आता जुन्या इमारतींचे इथे पुनर्विकास केले जात आहे. शिवाय मेट्रो मार्गाची देखील कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. यामुळे याचे महत्त्व आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, नाना पेठ, भवानी पेठ ग्राहक व व्यापाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारासाठी दुकाने उपलब्ध आहेत.

या भागात दुकानासाठी गाळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून ज्या लोकांनी या भागात गुंतवणूक केली आहे त्यांना दुकानाच्या भाड्यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी दुकानाच्या गाळ्यांच्या मोबदल्यात अधिक भाडे गुंतवणूकदारांना मिळत आहे. म्हणून रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी या भागात गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर असल्याचे या क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात.

भविष्यातली संधी
अलीकडे भारतात ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ई-कॉमर्स चा प्रभाव निश्चितच वाढत आहे. मात्र पेठांमध्ये याचा फारसा परिणाम झालेला नाही. विशेष बाब म्हणजे पुणे शहरात मॉल संस्कृती देखील विकसित झाली आहे. आता लोक मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करण्यास पसंती दाखवतात. पण या काळातही पेठांमध्ये रोजाना दीड लाखांपर्यंत ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. यामुळे भविष्यातही या संख्येत फारशी घसरण होणार नसल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे या संख्येत वाढ होऊ शकते असंही सांगितलं जात आहे. यामुळे व्यावसायिक मालमत्तेमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांना या भागात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते असे मत नमूद केले जात आहे. विशेष बाब म्हणजे पुणे शहर देशातील सातव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर बनले आहे.

पुण्यात राहणीमानाचा दर्जा देखील चांगला आहे. यामुळे व्यापारी वर्गासाठी येथे कमाई करण्याची अमाप संधी आहे. व्यापारी देखील या संधीचे सोने करतील यात शँका नाही. म्हणून ज्या लोकांना व्यावसायिक मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल अशा लोकांसाठी पुण्यातील पेठा चांगले स्थान ठरू शकतात असे मत आता व्यक्त होत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *