Pune News : केंद्र शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकारने देशात हिट अँड रन कायदा लागू केला आहे. मात्र हा कायदा वाहनचालकांची गळचेपी करणारां असल्याचा आरोप करत देशातील ट्रान्सपोर्ट युनियनने संप पुकारला आहे. याचा परिणाम म्हणून देशातील ट्रान्सपोर्ट ठप्प झाले आहे.
सध्या केंद्र शासनाच्या या निर्णयाविरोधात सर्वत्र जोरदार विरोध केला जात आहे. नवीन वाहन कायदा लागू झाल्यापासून याचा विरोध केला जात आहे. या नवीन वाहन कायद्यामुळे वाहनाचालकांची मोठी अडचण होणार आहे.
परिणामी देशातील वाहनचालक केंद्र सरकारच्या या नवीन कायद्याविरोधात चांगलेच आक्रमक बनले आहेत. याचा विरोध करण्यासाठी आणि केंद्र शासनाने लागू केलेला कायदा मागे घ्यावा यासाठी देशातील वाहनचालकांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे.
देशातील अनेक शहरांमध्ये कडकडीत संप पाळला जात आहे. या देशव्यापी संपात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रेलियम, इंडियन ऑईल या इंधन कंपन्यांसह इंडियन गॅस बॉटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालक सुद्धा सहभागी झाले आहेत.
यामुळे राज्यातील अनेक शहरातील पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा होणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा भासू शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे.
परिणामी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी राज्यासह देशातील अनेक शहरांमधील पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहेत. पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा राहणार नसल्याने पेट्रोल पंप बंद राहणार अशी भीती आहे.
परिणामी, कालपासूनच पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत आहे. अशातच मात्र पुणे पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.
पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन ने पुणे शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद राहणार की नाही याबाबत महत्त्वाचे अपडेट दिली आहे. असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल-डिझेल असोसिएशनने सहभागी न होण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
म्हणजेच पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंप चालू राहणार आहेत. पेट्रोल पंप बंद करण्याच्या निर्णयावर पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कंदरीत या राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नसल्याने शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.