Pune News : पुण्यात घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. राहण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी पुण्यात घर घेण्याला विशेष पसंती दाखवली जात आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरात घर घेणे, प्रॉपर्टी बनवण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहर आणि उपनगरांचा झालेला विकास आणि वाढलेले नागरिकीकरण यामुळे येथे निवासी मालमत्ता शोधणे मोठे आव्हानात्मक काम बनले आहे.
पुण्यातील कोणता परिसर राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातो. म्हणून आज आपण निवासी गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी पुण्यातील पाच सर्वोत्कृष्ट आणि पॉश ठिकाणांची माहिती जाणून घेणार आहोत.
NIBM रोड : जर तुम्हाला पुणे शहरात पॉश एरिया मध्ये राहायचे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरेल. हे ठिकाण अशा लोकांसाठी आहे ज्यांना विमानतळ आणि रेल्वे स्टेशन जवळ राहणे गरजेचे असेल. जर तुम्हाला तुमच्या कामानिमित्त नेहमीच प्रवास करावा लागत असेल तर या ठिकाणाला तुम्ही निवडू शकता. मात्र येथे प्रॉपर्टी च्या किमती या खूपच अधिक आहेत.
रेल्वे आणि विमानतळाच्या जवळ असल्यामुळे मालमत्तेच्या किमती खूप जास्त आहेत. हा शहरातील एक सर्वात पॉश आणि एक्सपेन्सिव्ह एरिया आहे. यामुळे जर तुम्ही निवासी मालमत्तेत गुंतवणूक करू इच्छित असाल आणि तुम्हाला तुमची मालमत्ता भाड्याने द्यायची असेल तर हा गुंतवणुकीचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. राहण्यासाठी सुद्धा हे ठिकाण चांगले आहे. म्हणजेच येते का खरेदी केलेली प्रॉपर्टी सोने की चिडियाँ राहणार आहे.
शिवाजी नगर : हे ठिकाण पुण्यातील एक पॉश ठिकाण आहे. राहण्यासाठी हा परिसर खूपच उत्कृष्ट आहे. शिवाजी नगरमध्ये अनेक सरकारी कार्यालये आहेत. म्हणजेच हा परिसर राहण्यासाठी एक सुरक्षित परिसर राहणार आहे. शिवाय येथील प्रॉपर्टीच्या किमती या कदाचित तुमच्या बजेटमध्ये देखील राहणाऱ्या आहेत.
तुम्ही पुण्यात परवडणाऱ्या दरात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा परिसर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन राहणार आहे. शिवाय आगामी काळात या परिसरातील प्रॉपर्टीच्या किमती देखील आकाशाला गवसणी घालणार असा अंदाज आहे. म्हणून येथील गुंतवणूक निश्चितच भविष्यात फायदेशीर ठरणार आहे.
मगरपट्टा : हा देखील एक अतिशय लक्झरीयस आणि पॉश एरिया आहे. निवासी मालमत्तांसाठी हा परिसर उत्कृष्ट असल्याचा दावा रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार करतात. हे पुण्यातील सर्वात महागड्या परिसरांपैकी एक आहे. आलिशान मालमत्ता, बंगले आणि अपार्टमेंटसह निवासी क्षेत्रे आहेत.
पण, मगरपट्टा शहरात मर्यादित व्यावसायिक मालमत्ता आहेत. मगरपट्टा शहर रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालयांशी चांगले जोडलेले आहे. यामुळे येथे निवासी मालमत्ता खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या परिसराची एक विशेषता म्हणजे येथे सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे प्रत्येक चौकात उपलब्ध आहेत.
खराडी : पुण्याच्या उपनगरीय भागात असले तरी खराडी हा एक पॉश भाग आहे. येथे गुंतवणुकीला खरचं खूप चांगला वाव आहे. हे मुख्यतः पुण्याच्या पूर्वेकडे स्थित आहे आणि ते त्याच्या आयटी पार्कसाठी ओळखले जाते. मोठ्या आयटी पार्क्स व्यतिरिक्त, काही लहान-उद्योग देखील आहेत.
विमानतळ आणि रेल्वेच्या जवळ असल्यामुळे खराडीमध्ये रिअल इस्टेट मालमत्तेच्या किमती खूप जास्त आहेत. मात्र येथील गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा देणार असा अंदाज आहे. शिवाय राहण्यासाठी हा भाग चांगला आहे. म्हणून निवासी मालमत्ता जर शोधत असाल हा देखील तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन राहणार आहे.
हडपसर : हडपसर हे पुण्याचे उपनगर शहर म्हणून ओळखले जात आहे. हे एक पॉश ठिकाण आहे. पण अद्याप विकासाच्या टप्प्यात आहे. कारण अजूनही या प्रदेशात विविध व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता तयार होत आहेत. वेगवेगळ्या विकासकांचे प्रकल्प इथे तुम्हाला नजरेस पडतील. हा परिसर निवासी मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी बेस्ट ठरू शकतो. तथापि गुंतवणुकीपूर्वी तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला एकदा अवश्य घेतला पाहिजे.