Pune News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. हे कल्चरल कॅपिटल म्हणून ओळखले जाणारे शहर राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवते. या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ओळखतात. येथे विविध शैक्षणिक संस्थांनी आपले बस्तान बसवले असल्याने याला शिक्षणाचे माहेरघर म्हणतात. अलीकडे तर विविध आयटी कंपन्यांनी देखील या शहराला प्राधान्य दिले आहे. परिणामी आता हे आयटी हब सुद्धा झाले आहे.

तसेच हे भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. पश्चिम घाटावर वसलेला हा परिसर सर्व बाजूंनी हिरवाईने नटलेला आहे. या सर्व कारणांमुळे पुण्यात शिक्षणासाठी, कामासाठी आणि रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. देशातील कानाकोपऱ्यातील लोक आता या शहरात येऊ लागले आहेत. पुण्यात राहणे हा नक्कीच एक उत्तम अनुभव असेल हे नाकारताही येत नाही.

शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढली असून पुणे नासिक आणि मुंबई या सुवर्ण त्रिकोणात या शहराचा विकास गेल्या काही वर्षांमध्ये सर्वाधिक झाला आहे हे नक्कीचं आहे. यामुळे शहराच्या आर्थिक समृद्धी होत आहे. परिणामी आता या ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. पुणे शहरात रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढत आहे.

सोबतच शांत, सुंदर आणि सर्व सोयी सुविधा असणारे हे शहर आता राहण्यासाठी देखील लोकांची पहिली पसंत ठरू लागले आहे. म्हणून निवासी मालमत्तांची मागणीही वाढत आहे. ही सिटी आता घर खरेदीदारांचे लक्ष वेधून घेत आहे. पुणे हे असे एक परिपूर्ण शहर आहे जे काम आणि जीवन यांच्यात संतुलन ठेवू पाहणाऱ्यांची पहिली पसंत बनले आहे.

दरम्यान आज आपण पुण्याला राहण्यासाठी जाण्‍याचा विचार करणाऱ्या आणि पॉश लिव्हिंग एरियामध्‍ये मालमत्ता मिळवण्‍याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी शहरातील सर्वोत्तम टॉप 5 पॉश ठिकाणाविषयी माहिती घेऊन आलो आहोत. यामुळे जर तुम्ही पुण्यात राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी पॉश प्रॉपर्टी शोधत असाल तर आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्कीच वाचा.

हिंजवडी : शहरातील सर्वात पॉश ठिकाण. IITian लोकांचा हा परिसर आहे. या भागात मोठमोठ्या आयटी कंपन्या पाहायला मिळतील. म्हणून या भागाला आयटी हब म्हणून ओळख मिळाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या परिसराचा लक्षणीय विकास झाला आहे, यात शन्काचं नाही. परिणामी आता विविध रिअल इस्टेट विकासकांचे या परिसराकडे विशेष लक्ष लागले आहे. निवासी रिअल इस्टेटची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक रिअल इस्टेट प्रकल्प इथे साकार झाले आहेत. हिंजवडी शहराच्या मध्यभागी वसलेले ठिकाण आहे. यामुळे जर तुम्ही शहरात गुंतवणुकीचा विचार करत असाल किंवा राहण्यासाठी प्रॉपर्टी शोधत असाल तर हिंजवडीबाबत नक्कीच एकदा विचार करू शकता.

विमान नगर : हिंजवडीनंतर या यादीत विमान नगर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे देखील एक वेगाने विकसित होत असलेले ठिकाण आहे. हा परिसर देखील नोकरी आणि घर या दोघांसाठी उत्तम राहणार आहे. कामासाठी आणि राहण्यासाठी हा परिसर खूपच चांगला आहे. या ठिकाणी अनेक आयटी पार्क आहेत. पुण्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या निवासी क्षेत्रांपैकी एक म्हणून या परिसराकडे पाहिले जात आहे. विमान नगरमध्ये तुम्हाला आरामदायी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. विमान नगर हे कल्याणी नगर, लोहेगाव, धानोरी आणि बरेच काही सारख्या जवळच्या परिसरांशी चांगले जोडले गेले आहे. शहराच्या मध्यभागी वसलेले हे ठिकाण अनेकांच्या आवडीचे आहे. तुम्हीही या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करू शकता.

कोरेगाव पार्क : या यादीतील तिसरे सर्वात भारी ठिकाण. जर पुण्यात राहण्यासाठी ठिकाण शोधत असाल तर कोरेगाव पार्क तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. हे पुण्यातील प्रमुख निवासी स्थानांपैकी एक आहे. कोरेगाव पार्कमध्ये उच्च-मूल्याच्या स्थावर मालमत्तेशिवाय अनेक व्यावसायिक मालमत्ता आहेत. शहराच्या मध्यभागी वसलेले असल्याने याला पुण्याचे हृदय म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शहरातील पॉश ठिकाणांपैकी एक असलेले हे ठिकाण राहण्यासाठी बेस्ट आहे आणि गुंतवणुकीसाठी देखील या भागाला भविष्यात अच्छे दिन येणार असे वाटत आहे. कोरेगाव पार्कमध्ये बेस्ट कॅफे, रेस्टॉरंट्स आहेत. हे मध्यभागी वसलेले ठिकाण आहे. म्हणून येथून शहरातील इतर भागात जाणे सोपे आहे. या भागाला चांगली कनेक्टिव्हिटी मिळालेली आहे. कोरेगाव पार्कचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ते निसर्ग आणि आधुनिक सुविधा यांचे परिपूर्ण मिश्रण देते. यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहणं आवडत असेल पण शहराजवळचा परिसर पण हवा असेल तर हा परिसर तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो.

औंध : तुम्हाला शांतता, लक्झरी आणि आराम हवा असेल, तर तुम्ही औंधमध्ये राहण्याचा विचार केला तर काही वावगे ठरणार नाही. कारण या तिन्ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. हा पुण्यातील एक शांत अन नावाजलेला भाग आहे. औंध तेथील वातावरणामुळे लोकांमध्ये खूपचं लोकप्रिय आहे. निवासी रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी हा सर्वात पसंतीचा पर्याय आहे यात आश्चर्य नाही. म्हणून जर तुमचाही पुण्यात राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी इन्वेस्ट करण्याचा प्लॅन असेल तर आओ ना फिर औंध मे !

कल्याणी नगर : पुण्यातील हा एक पॉष परिसर आहे. कल्याणी नगर हे अशा परिसरांपैकी एक आहे जिथे तुम्हाला व्यावसायिक प्रकल्पांपासून निवासी प्रकल्पांपर्यंत सर्व काही मिळू शकते. इथं आयटी पार्क्स, शॉपिंग मॉल्स आणि करमणूक केंद्र सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल. यामुळे राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी हे ठिकाण सर्वोत्कृष्ट ठरू शकते. येथे सार्वजनिक वाहतूक देखील येथे उपलब्ध आहे. कल्याणी नगर हे पुणे जंक्शन रेल्वे स्थानकापासून अगदी जवळ आहे. म्हणजे या भागाला खूपच चांगली कनेक्टिव्हिटी मिळालेली आहे. परिणामी निवासी मालमत्तेसाठी हा परिसर तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच ॲड करा.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *