Pune News
Pune News

Pune News : पुणे जिल्ह्यातील लोणावळा हे एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. या पर्यटनक्षेत्राला देशातून तसेच विदेशातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही लाखोच्या घरात आहे. लोणावळा हे फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन आहे.

यामुळे आता या टुरिस्ट डेस्टिनेशनचा कायाकल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या टुरिस्ट डेस्टिनेशनला आणखी विकसित केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा नजीक असणाऱ्या लायन्स आणि टायगर पॉईंट येथे स्काय वॉक विकसित करण्यात येणार आहे.

हे ठिकाण लोणावळ्यापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी आता जागतिक दर्जाचे स्काय वॉक तयार केले जाणार आहे. यामुळे लोणावळ्यात दोन हजार फूट दरीतून चालण्याचा मनमुराद आनंद घेता येणार आहे.

लोणावळ्यातील विलोभनीय दृश्य आधीच पर्यटकांच्या मनात घर करून आहे. दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोणावळ्याच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे.

हा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच पीएमआरडीएच्या माध्यमातून विकसित केला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या प्रकल्पासाठी मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांनी मोठा पाठपुरावा केला होता. शेळके यांच्या संकल्पनेतूनच हा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे.

कुठं तयार होणार स्काय वॉक 

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील वन विभागाच्या मौजे आतवन येथे हा प्रकल्प विकसित होणार आहे. या भागातील राखीव वन गट क्रमांक १६६ मधील आठ हेक्टर क्षेत्रात हा स्काय वॉक प्रकल्प तयार केला जाणार आहे.

पीएमआरडीएकडून विकसित होणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पर्यटन विकास विभागाकडून निधी दिला जाणार अशी माहिती देखील समोर येत आहे.

याबाबतचा निर्णय नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

केव्हा सुरु होणार काम

खरे तर सद्यस्थितीला या प्रकल्पासाठी फक्त जागा अंतिम करण्यात आली आहे. हा प्रकल्प कसा राहणार याबाबत अद्याप सविस्तर माहिती हाती आलेली नाही. पण याबाबतचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट लवकरच तयार होणार आहे.

याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अर्थातच सर्वकष प्रकल्प आराखडा हा पीएमआरडीए कडून तयार होणार असून यासाठी काम सुरू झाले आहे. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाल्यानंतर मग या प्रकल्पाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि त्यानंतर मग या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *