Pune News : दरवर्षी सुरू होण्यास अवघ्या चार दिवसांचा काळ बाकी आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अनेकजण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांवर जाण्याचा प्लॅन बनवत आहेत. त्यासाठी अनेकांनी हॉटेल देखील बुक केल्या आहेत.

31 डिसेंबरची रात्र सेलिब्रेट करण्यासाठी आत्तापासूनच अनेकांची प्लॅनिंग सुरू झाली आहे. अशातच मात्र पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील पुणे-नगर मार्गावरील वाहतूकित नवीन वर्षाच्या पूर्वीच बदल केला जाणार आहे.

जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या मौजे पेरणे फाटा येथे एक जानेवारी 2024 ला जयस्तंभ अभिवादन सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतुक बंद केली जाणार आहे.

या काळात पुणे-नगर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या मार्गावरील वाहतुक काही काळासाठी बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, 31 डिसेंबर 2023 सायंकाळी 5 ते 1 जानेवारी 2024 रात्री 12:00 वाजेपर्यंत मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.

तथापि, अभिवादन सोहळ्याला जी वाहने जातील त्या वाहनांना या मार्गावर परवानगी राहणार असल्याचे वृत्त समोर आल्यावर आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना या कालावधीत या मार्गाने जाता येणार नाही.

जर या कालावधीत या मार्गाने प्रवास करायचा असेल तर इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. दरम्यान प्रशासनाने प्रवाशांना या बदलाची नोंद घेण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर ते चाकण आणि चाकण ते शिक्रापूर हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहणार आहे. आता आपण हा मार्ग बंद राहणार असल्याने प्रवाशांसाठी कोणते पर्यायी मार्ग उपलब्ध राहतील याची माहिती जाणून घेणार आहोत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी जयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी बंद राहणार असल्याने या कालावधीत पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या जड वाहनांना खराडी बायपास चौकातून हडपसरमार्गे पुढील प्रवास करता येणार आहे.

तसेच नगरकडून पुणे, मुंबईकडे येणारी जड वाहने शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, सोलापूर रोडमार्गे पुण्याकडे जाऊ शकणार आहेत.

यासोबतचं मुंबईकडून नगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे नगरकडचा प्रवास करतील अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. याशिवाय मुंबई व ठाणेकडून नगरकडे जाणारी हलकी वाहने ही  वडगाव-मावळ-तळेगाव-चाकण-खेड-पाबळ शिरुरमार्गे नगरकडे जाऊ शकणार आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *