Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर नवीन वर्ष सुरू होण्याचा आता अवघ्या काही तासांचा काळ शिल्लक राहिला आहे. येत्या काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अशातच मात्र पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. ते म्हणजे आता शहरातील एक महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
नववर्षानिमित्त सालाबादाप्रमाणे येत्या नवीन वर्षात म्हणजे 1 जानेवारी 2024 ला छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूकित महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. शहरातील काही महत्त्वाचे रस्ते उद्या बंद राहणार आहेत. यामुळे शहरातील वाहनाच्या लोकांना दुसऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
याबाबत वाहतूक शाखेच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी महाराज रस्त्यावर उद्या गर्दी होण्याची शक्यता असल्याने हा रस्ता बंद करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
हा रस्ता उद्या वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांना जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौकमार्गे टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जाता येणार आहे.
तसेच जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनाकडे जाणारा मार्ग वाहनांसाठी बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे या मार्गावरील वाहनचालकांना जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, महापालिका भवनमार्गे पुढील प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
तसेच अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, परिणामी येथील वाहनचालकांना बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी पोहचता येणार आहे. शिवाय, शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौकातून दारूवाला पुलाकडे जाण्यास वाहन चालकांना जाता येणार नाही.
परिणामी, या मार्गावरील वाहनचालकांना गाडगीळ पुतळामार्गे, कुंभारवेस चौक, पवळे चौक, साततोटी चौकमार्गे इच्छितस्थळी पोहोचता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.