Pune News : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकसंख्या वाढली असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा ताण येत आहे. सध्या स्थितीला अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवर वाढत्या लोकसंख्येचा ताण येऊ लागला आहे.
हेच कारण आहे की आता शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. दरम्यान जिल्ह्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध रस्ते विकासाची प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे केली जात आहेत. पुणे ते नगर आणि पुणे ते नाशिक या महामार्गांवर गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे येथे ट्रॅफिक जामची समस्या एक कॉमन गोष्ट बनली आहे.
परिणामी ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता या महामार्गांचा विस्तार केला जाणार आहे. सोबतच येथे उन्नत मार्ग देखील तयार केले जाणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ही कामे केली जाणार असून याचं दोन्ही महामार्गांच्या कामासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
काय कामे होणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, NHAI कडून पुणे-शिरूर दरम्यान सहापदरी महामार्ग विकसित केला जाणार असून त्यावर सहा पदरी उड्डाणपूल तयार होणार आहे. तसेच नाशिक फाटा ते खेड दरम्यान दोन पदरी सेवा रस्त्यांसह आठ पदरी उड्डाणपूल बांधला जाणार आहे. यासाठी जवळपास 13000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
दरम्यान या प्रकल्पांच्या कामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एका प्रतिष्ठित मेडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या वृत्तानुसार या दोन्ही महामार्गांच्या उन्नत मार्गांच्या बांधकामासाठीच्या निविदा एनएचएआयने म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकत्याच प्रसिद्ध केल्या आहेत.
यानुसार पुणे-शिरूर मार्गासाठी साडेसात हजार कोटी रुपयाचा खर्च केला जाणार आहे. तसेच नाशिक फाटा-खेड मार्गासाठी सहा हजार तीनशे कोटी रुपये खर्च होणार आहेत. म्हणजेच या दोन्ही मार्गांसाठी जवळपास 13 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पुणे-शिरूर मार्गावर काय कामे होणार ?
या प्रकल्पांतर्गत पुणे ते शिरूर दरम्यान सहा पदरी मार्ग बनवला जाणार आहे. यानंतर मग या मार्गावर सहा पदरी उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. या मार्गाची सुरुवात पुणे शहराच्या हद्दीपासून होणार आहे.
नाशिक फाटा ते खेड मार्गावर काय कामे होणार ?
सद्यस्थितीला नाशिक फाटा ते खेड महामार्ग काही टप्प्यात चार पदरी आहे. आता तो आवश्यकतेनुसार सहापदरी केला जाणार आहे. तसेच या मार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते तयार केले जातील. याशिवाय नाशिक फाटा ते खेड या संपूर्ण मार्गावर आठ पदरी उड्डाणपूल तयार केला जाणार आहे.