Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहरात विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत. प्रामुख्याने रस्तेविकासाची अनेक प्रकल्प पूर्ण झाली आहेत. तसेच काही रस्ते मार्गांवरील दुरुस्तीची कामे देखील हाती घेण्यात आली आहेत.
काही पुलांच्या दुरुस्तीची कामे देखील सध्या सुरु आहेत. दरम्यान पुणे शहरातील एक अतिशय महत्त्वाचा पूल दुरुस्तीच्या कामांसाठी वाहतुकी करिता बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे शहरातील नागरिकांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून पुलाचे दुरुस्तीचे काम होईपर्यंत पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोणता पूल राहणार बंद ?
मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहरातील पुना हॉस्पिटल जवळील यशवंतराव चव्हाण पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पुढील महिन्यावर सुरू राहणार आहे. शुक्रवारपासून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
पुना हॉस्पिटल जवळील यशवंतराव चव्हाण पूल दुरुस्तीच्या कामासाठी पुढील महिन्यापर्यंत बंद राहणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 29 फेब्रुवारी पर्यंत हे काम सुरू राहणार आहे.
या कालावधीत पुलाचे बेअरिंग आणि एक्स्पेन्शन जॉइंट बदलले जाणार अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.
यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर या ठिकाणी करावा लागणार आहे. आता आपण या पुलासाठी कोणते पर्यायी मार्ग नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
पर्यायी मार्ग कोणते राहणार ?
प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नवी पेठ येथून पूना हॉस्पिटलकडे, डेक्कनकडे जाणाऱ्या प्रवाशांना जोपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तोवर गांजवे चौकातून पुढे टिळक चौक, छत्रपती संभाजी पूल (लाकडी पूल), खंडोजीबाबा चौक या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
तसेच कर्वे रोडने नवी पेठकडे जाणाऱ्या प्रवाशांना या कालावधीमध्ये खंडोजीबाबा चौक, छत्रपती संभाजी पूल, खंडोजीबाबा चौक मार्गाचा वापर करून त्यांना हवे त्या ठिकाणी जाता येणार आहे. एकंदरीत 29 फेब्रुवारी पर्यंत वाहन चालकांना यशवंतराव चव्हाण पुलाचा वापर करता येणार नाही.
यामुळे याची नोंद वाहन चालकांनी घ्यायचे असून या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करायचा आहे. निश्चितच या पुलाच्या कामामुळे काही काळ येथील प्रवाशांना थोडासा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.