Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी खुशखबर समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून संपूर्ण जगात लोकप्रिय असलेल्या आपल्या पुण्यात ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

खरे तर गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील काही प्रकल्प गुजरात राज्यात गेलेत. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मात्र विरोधकांनी सरकारवर टीका केली. अनेकांनी सरकारला या मुद्द्यावरून धारेवर धरले.

विशेष म्हणजे वर्तमान महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असलेले अजित पवार यांनी देखील विरोधात असताना शिंदे-फडणवीस सरकारचा या मुद्द्यावरून खरपूस समाचार घेतला होता. आता मात्र अजितदादा हे स्वतः महायुतीत आहेत.

सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. विशेष म्हणजे अजितदादा सत्तेत आल्यानंतर देखील काही छोटे मोठे प्रकल्प दुसरीकडे गेलेत. यामुळे विरोधकांकडून महायुती सरकारवर कठोर टीका करण्यात आली.

विशेष म्हणजे राज्यातील सारे प्रकल्प फक्त गुजरातला जात असल्याने विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता. अशातच मात्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे.

फडणवीस यांनी आपल्या पुण्यात ह्युंदाई ही लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली आहे. या गुंतवणुकीमुळे पुण्यात रोजगाराच्या नवीन संधी तयार होणार आहेत.

पुण्यातील तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा एकात्मिक विकास या निमित्ताने सुनिश्चित होणार आहे. फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ह्युंदाई कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबतचे फोटो पब्लिश केले आहेत.

तसेच ही कंपनी पुण्यातील तळेगाव येथे 7000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे याबाबतचा महाराष्ट्र शासन सोबत सामंजस्य करार व्हावा यासाठी ते पुढील आठवड्यात दावोस येथे जाणार आहेत.

खरे तर पुण्यात आधी देखील अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आपले बस्तान मांडून आहेत, टाटा सारख्या दिग्गज कंपनीचे प्रकल्प इथे आहेत आणि आता ह्युंदाई या नामांकित कंपनीचे प्रकल्प देखील पुण्यात येणार आहेत.

यामुळे आता पुण्यात रोजगाराच्या नव्या वाटा तयार होतील आणि बेरोजगार नवयुकांच्या हाताला काम मिळेल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *