Pune News : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक राजधानीतील अर्थातच पुण्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबर 2023 ला पुणे शहरातील वाहतुकीत एक मोठा बदल करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने ११ डिसेंबरला पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक, गरूड गणपती चौक दरम्यान वॉकींग प्लाझा तयार केला जाणार आहे.

यामुळे वाहतुकीत बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे.या वॉकिंग प्लाझाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत वाहतुकीत बदल केला जाणार आहे.

महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून हाती आलेल्या माहितीनुसार, वॉकिंग प्लाझाच्या पार्श्वभूमीवर 11 डिसेंबरला शहरातील लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे.

तसेच सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक दरम्यान वाहतूकीची परिस्थीती पाहून आवश्यकतेप्रमाणे निर्णय घेतला जाईल आणि योग्य तो बदल केला जाईल अशी माहिती समोर येत आहे. सहाजिकच, वाहतुकीत झालेला हा बदल थोड्या काळासाठी नागरिकांना अडचणीत आणणारा ठरू शकतो.

दरम्यान 11 डिसेंबरला वाहतुकीत बदल केला जाणार असल्याने शहरातील नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. यामुळे आता आपण सदर पर्यायी मार्गांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे राहतील पर्यायी मार्ग 

11 डिसेंबरला वॉकिंग प्लाझा ज्या वेळेत आयोजित असेल त्या वेळेत लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकातून टिळक चौकाकडे जाणारी वाहतूक सेवासदन चौकातून उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने नागरिक इच्छितस्थळी जाऊ शकणार आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कुमठेकर रस्त्यावरून लक्ष्मी रस्त्यावर जाणारी सर्व वाहने सरळ चितळे कॉर्नर डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने नागरिक इच्छितस्थळी जाऊ शकणार आहेत.

रमणबाग चौकाकडून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणारी वाहने लक्ष्मी रस्त्याकडे न जाता सरळ केळकर रस्त्याने टिळक चौक मार्गे इच्छितस्थळी जाऊ शकणार आहेत.

निंबाळकर तालीम चौकाकडून कुंठे चौकाकडे जाणारी सर्व वाहने लक्ष्मी रस्त्याकडे न जाता सरळ केळकर रस्त्याने टिळक चौक मार्गे नागरिकांना जिथे जायचे असेल तिथे ते जाऊ शकणार आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *