Pune News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानी अर्थातच मुंबईत गगनचुंबी इमारती पाहायला मिळतात. मुंबईमध्ये चाळीस-पन्नास मजला इमारत सहजतेने नजरेस पडतात. मुंबईमधील कमी क्षेत्रफळ आणि वाढती लोकसंख्या यामुळे या शहरात अशा इमारतींची गरज देखील आहे.
यामुळे येथे विकासकांच्या माध्यमातून टोलेजंग इमारती विकसित केल्या जातात. गगनचुंबी इमारतींमुळे मुंबई शहराची एक वेगळीच ओळख तयार झाली आहे. विशेष म्हणजे आता राजधानी मुंबई प्रमाणेच सांस्कृतिक राजधानी पुण्यातही गगनचुंबी इमारती तयार होणार असे चित्र आहे.
नुकत्याच दोन दिवसांपूर्वी महापालिकेने पुण्यातील पहिल्या-वहिल्या 40 मजला टोलेजंग इमारतीच्या प्रकल्पाला मंजुरी देखील दिली आहे. आतापर्यंत सांस्कृतिक राजधानीत अशी मोठी इमारत तयार झालेली नाहीये.
मात्र आता पुण्यात 160 मीटर उंचीची इमारत बांधून तयार होणार आहे. या इमारतीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या आयुक्तांनी नुकतीच परवानगी दिली आहे. यामुळे पुण्याची ही आगामी काही वर्षात गगनचुंबी इमारतींचे शहर म्हणून ओळख होईल असे बोलले जात आहे.
खरे तर पुणे शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथे विविध शैक्षणिक संस्थानांनी आपले बस्तान बसवलेले आहे. याशिवाय अलीकडे अनेक आयटी कंपन्या देखील पुण्यात उघडल्या गेल्या आहेत.
यामुळे पुण्याला अलीकडे आयटी हब म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. परिणामी आता पुणे शहरात शिक्षणासाठी उद्योगासाठी आणि रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे आता पुणे शहरातही जागेची टंचाई भासणार असे बोलले जात आहे. यामुळे पुणे शहरात जागेच्या आणि घरांच्या किमती देखील दिवसेंदिवस वाढत आहेत.
दरम्यान जागेचा शॉर्टेज पाहता आता येथे उंच इमारतींना देखील परवानगी मिळू लागली आहे. याचाच एक भाग म्हणून 9 जानेवारी 2024 ला महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या हायराईज कमिटीच्या बैठकीत मोठा निर्णय झाला आहे.
याबैठकीत आत्तापर्यंतच्या सर्वात उंच म्हणजे १६० मिटर उंचीच्या इमारतीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. खरे तर पुणे महापालिकेने आत्तापर्यंत ४१ उंच प्रस्तावांना मान्यता मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी १५ प्रकल्प हे १०० मिटर पेक्षा जास्त उंचीच्या इमारतींचे आहेत.
मात्र अजून तरी पुण्यात 160 मीटर उंचीची इमारत तयार झालेली नाही. ही पहिली इमारत असेल जी 160 मीटर उंचीची राहणार आहे. या इमारतीत 40 मजले राहणार असून ही इमारत पुण्यातील बोपोडीमध्ये तयार होणार आहे.