Pune News : आंबा हे असे फळ आहे जे प्रत्येकालाच आवडते. याची चव चाखणे लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. यामुळे आंब्याचा सिझन केव्हा येतो याची खवय्ये मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात.
आंब्याचा विषय निघाला की, सर्वात लोकप्रिय हापूस आंब्याच चित्र डोळ्यापुढे उभ राहणार नाही असं होऊच शकत नाही. हापूस आंब्याला बाजारात मोठी मागणी असते.
विशेषता रत्नागिरी आणि देवगड येथील हापूस आंब्याला महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमध्ये मोठी मागणी पाहायला मिळते. विदेशात देखील कोकणातील हापूस मोठा भाव खातो.
अनेकांना हापूसची चव खूपच आवडते. कदाचित तुम्हीही त्यातलेच एक असाल. तुम्हालाही हापूस आंबा चाखने विशेष पसंत असेल. दरम्यान, लोकप्रिय हापूस आंब्याची पुण्यात एंट्री झाली आहे. पुण्यात दाखल झालेली ही या हंगामातील पहिलीच पेटी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काल अर्थातच 18 जानेवारी 2024 ला पुणे एपीएमसी अंतर्गत येणाऱ्या गुलटेकडी मार्केटमध्ये रत्नागिरी येथील हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे.
वास्तविक या आधी देखील पुण्यात हापूस आंबा आला होता. मात्र, हा देवगडचा हापूस आंबा होता. या हंगामातील रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी काल अर्थातच 18 जानेवारीला गुलटेकडी मार्केटमध्ये आली आहे.
खरे तर, फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात रत्नागिरी हापूस बाजारात येत असतो. यंदा मात्र एक महिना आधीच हापूसची बाजारात एन्ट्री झाली आहे.
यामुळे खवय्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीपासून 20 किलोमीटरवर असलेल्या पावस भागातील शेतकरी सुनील यांनी गुलटेकडी मार्केटमध्ये ही रत्नागिरी हापूस ची पेटी विक्रीसाठी आणली होती.
यावेळी या हापूस पेटीची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच या महूर्ताच्या हापूस आंब्याच्या पेटीला विक्रमी भाव मिळाला आहे.
या पेटीला 21,000 रुपयाचा भाव मिळाला आहे म्हणजेच एक आंबा 440 रुपयाला विकला गेला आहे. हापूस भेटीला चांगला विक्रमी भाव मिळाला असल्याने सदर शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले आहे.