Pune News : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. याशिवाय लग्नसराई आणि सणासुदीचा देखील हंगाम सुरु आहे. यामुळे देशभरातील विविध रेल्वे मार्गांवर उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रणात येत आहे.
खरे तर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी उन्हाळी विशेष गाड्या सुरू केल्या जातात. यंदा देखील विविध मार्गांवर रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्या सुरू केलेल्या आहेत.
यामध्ये हडपसर ते गुवाहाटी या समर स्पेशल ट्रेनचा देखील समावेश होतो. पुण्यातील हडपसर या रेल्वे टर्मिनलवरून गुवाहाटीसाठी समर स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. दरम्यान आता आपण या समर स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर-गुवाहाटी (गाडी क्रमांक ०५६०९) ही विशेष गाडी नऊ मे ते २७ जून या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे.
म्हणजेच रेल्वेची ही उन्हाळी विशेष गाडी साप्ताहिक आहे. ही ट्रेन या कालावधीत पुण्यातील हडपसर रेल्वे टर्मिनल वरून प्रत्येक गुरुवारी सकाळी १० वाजता सोडली जाणार आहे.
तसेच ही विशेष गाडी गुवाहाटी रेल्वे स्थानकावर तिसऱ्या दिवशी सकाळी सव्वा आठ वाजता पोहोचणार आहे. तसेच, गुवाहाटी-हडपसर (गाडी क्रमांक ०५६१०) ही विशेष गाडी सहा मे ते २४ जून या कालावधीत चालवली जाणार आहे.
या काळात ही गाडी दर सोमवारी गुवाहाटी येथून रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि पुण्यातील हडपसरला तिसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे.