Pune News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. अलीकडे पुण्याला आयटी हब म्हणूनही ओळखले जाते. बेंगलोर आणि हैदराबाद प्रमाणेच पुणे शहरात देखील विविध आयटी कंपन्यांनी आपल्या बस्तान बसवले आहे.
याशिवाय पुणे हे एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे. पुण्यात फिरण्यासाठी अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. पुणे शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना दररोज हजारो पर्यटक भेटी देत असतात.
विशेष म्हणजे फक्त पुण्यातच फिरण्यासाठी चांगले स्पॉट आहेत असे नाही तर पुणे शहरालगतही शेकडो प्रसिद्ध पर्यटन स्थळे पाहायला मिळतात.
दरम्यान आज आपण या शेकडो प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी पाच ठिकाणांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हीही या वीकेंडला कुठे फिरायला निघत असाल तर पुण्याजवळील ही पाच ठिकाणे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात.
पवना तलाव : जर तुम्ही या वीकेंडला वन डे ट्रिप काढण्याच्या तयारीत असाल तर पवना लेक अर्थात पवना तलाव तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. हे ठिकाण सांस्कृतिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
या प्रसिद्ध पर्यटन स्थळाची विशेषता म्हणजे येथे कॅम्पिंग साठी सुविधा उपलब्ध आहे. यामुळे जर तुम्हाला या वीकेंडला चील करायचे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट राहणार आहे.
राजगड किल्ला : तुम्हीही जर दुर्गप्रेमी असाल, तुम्हालाही किल्ल्यांना भेटी देणे आवडत असेल तर पुण्यापासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या राजगड किल्ल्याला तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे. या किल्ल्याची राजांचा गड आणि गडांचा राजा म्हणून ओळख आहे.
पुण्यापासून अवघ्या 48 किलोमीटर अंतरावर हा सुंदर किल्ला तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही विकेंडला ट्रिप काढत असाल तर राजगड किल्ल्याला तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे.
खडकवासला धरण : या वीकेंडला तुम्हाला पुण्यापासून जवळच्याच एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्यायची असेल तर खडकवासला धरण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहील.
कारण की हे ठिकाण पुण्यापासून फक्त आणि फक्त 20 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. एका दिवसाची ट्रिप ज्यांना काढायची असेल त्यांच्यासाठी खडकवासला धरण हा बेस्ट ऑप्शन ठरेल.