Pune News : पुणे, मुंबई आणि नाशिक ही महाराष्ट्राची तीन महत्त्वाचे शहरे राज्याचे सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जातात. एकमेकांना त्रिकोणात छेदत असलेली ही शहरे राज्याच्या एकात्मिक विकासाचे मापदंड मोजण्यासाठी महत्वाची आहेत.
या तिन्ही शहरांच्या आपापल्या विशेषता आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तर नासिक देशातील एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ आहे. पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. हे शहर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवते.
यामुळे राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचा या शहराला दर्जा देण्यात आला आहे. एवढेच नाही तर या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखतात. येथे देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादित असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थित आहे.
याशिवाय पुण्यात इतरही अनेक शैक्षणिक संस्था आहेत. शिवाय पुण्यात स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यासाठी देखील लाखो विद्यार्थी येतात. येथे विविध कोचिंग इन्स्टिट्यूट उभारण्यात आले आहेत. अलीकडे तर हिंजवडी, बाणेर यांसारख्या भागात मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे.
यामुळे येथे शिक्षणासाठी आणि कामानिमित्त स्थायिक झालेल्या लोकांची संख्या खूपच अधिक आहे. शिवाय, दररोजच येथे नवीन लोक येतात. कामानिमित्त आणि शिक्षणानिमित्त मनात असंख्य स्वप्न घेऊन दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक पुण्यात येतात.
मात्र या स्वप्नांच्या गर्दीत अनेकांचे वेगवेगळे प्रश्न पाहायला मिळतात. अनेकांच्या माध्यमातून पुण्यात आरामात जगण्यासाठी किती पगार पुरेसा आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो ? खरे तर हा प्रश्न नव्याने पुण्यात जाणाऱ्या प्रत्येकांसाठीच खूपच खास आहे असं म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही.
पण आता याचे उत्तर देणार कोण ? तर पुणेकरांनीच याचे उत्तर दिले आहे. पुण्यात आरामात जगण्यासाठी किती पगार अपेक्षित आहे यावर पुणेकरांनी वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. खरे तर सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा खूपच वापर वाढलेला आहे.
इंस्टाग्राम हे देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अलीकडे खूपच लोकप्रिय बनले आहे. या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे Reels, व्हिडीओज तुम्हाला व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळेल. याच इंस्टाग्रामवर Maze Pune या अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये पुण्यात आरामात राहण्यासाठी किती पगार पुरेसा आहे? हा प्रश्न विचारला गेला आहे. यावर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
एकाने लिहिलेय महिन्याला दहा लाख पगार असेल तरी पुरणार नाही. तर एकाने निदान वीस हजार रुपये तरी पगार पाहिजे असे लिहले आहे. याशिवाय एका युजरने पन्नास हजार रुपये पगार राहिला तर पुण्यात भागेल असे मत व्यक्त केले आहे.
तर एकाने लिहिलेय की पैसा कितीही कमवा पण माणूस इथे आपली ओळख हरवून बसतो. याशिवाय, एकाने पगार कितीही असू दे पण सुखी राहण्यासाठी आपले आईवडिल जवळ पाहिजे, असे म्हटले आहे. एकूणच काय की पुण्यात पगार किती असावा ? या प्रश्नांवर पुणेकरांनी आपापले मत व्यक्त केले आहे.