Pune News : पुणे हे भारतातील एक हिरवळीने नटलेले सुंदर शहर आहे. या शहराला महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा मिळाला आहे. या शहरात विविध शैक्षणिक संस्थानांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच अधिक आहे.

सोबतच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी देखील पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.यामुळे शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. अलीकडे शहरात आयटी कंपन्या देखील वाढल्या आहेत.

यामुळे या शहराला आयटी हब म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. शहरात कामानिमित्त आणि शिक्षणासाठी स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.यामुळे गेल्या काही वर्षात शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आगामी काळात ही लोकसंख्या आणखी वधारणार आहे.

पुण्याच्या बाबतीत एक म्हण विशेष लोकप्रिय आहे, ती म्हणजे पुणे तेथे काय उणे. पुण्यात जवळपास सर्वच मिळतं. शाब्दिक मारा देणाऱ्या पुणेरी पाट्या, पुण्याचे टोमणे, पुण्याची भाषा, येथील खाद्यपदार्थ आणि येथील ऐतिहासिक वास्तूबाबत कायमच समाजमनांमध्ये चर्चा पाहायला मिळते.

Pune फक्त आयटी कंपन्यांसाठी आणि शिक्षणासाठीच लोकप्रिय आहे असे नाही तर येथे पर्यटकांसाठी देखील विविध फेमस स्पॉट आहेत. ऐतिहासिक वास्तू आहेत. यामुळे येथे पर्यटकांची देखील नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. यामुळे सोशल मीडियावरही पुण्याचे अनेक व्हिडिओज वेगाने व्हायरल होत असतात.

दरम्यान पुण्यातील असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शहरातील एका पडत्या इमारतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पडती इमारत दाखवली गेली आहे.

पण ही इमारत खरंच पडत नाहीये तर या इमारतीचे बांधकाम असे पडते करण्यात आले आहे. यामुळे ही इमारत आपल्याला पडणार की काय, असा भास होतो. हेच कारण आहे की या पडत्या इमारतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये चांगलाच पसंत केला जात आहे.

https://www.instagram.com/reel/CzYgLEAKQG5/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==

कुठं आहे ही इमारत

सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत असलेली ही पडती इमारत पुण्यातील आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात ही इमारत आहे. जे पण लोक पुण्यातील कॅम्प परिसरातून जातात ते नक्कीच या इमारतीला पाहण्यासाठी थांबतात. पुणे शहर भ्रमंती करण्यासाठी आलेले टुरिस्ट तर आवर्जून या इमारतीचे फोटो काढतात.

या इमारतीला देण्यात आलेला कलर देखील खूपच युनिक आहे. या इमारतीचे बांधकाम स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी इंजीनियरने घेतलेली मेहनत आणि त्याची युनिक कन्सेप्ट निश्चितच वाखाण्याजोगी आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *