Pune News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याला एक नवीन महामार्गाची भेट मिळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात विविध रस्ते प्रकल्पाची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही अनेक रस्ते प्रकल्पांची कामे महाराष्ट्रात सुरू आहेत.
तसेच काही मार्गांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. पुणे ते नासिक दरम्यान सुद्धा नवीन ग्रीन फील्ड कॉरिडोर प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास जलद होणार आहे.
सध्या स्थितीला या दोन्ही शहरादरम्यानच्या प्रवासासाठी 5 तासांचा कालावधी लागत आहे. मात्र हा ग्रीन फील्ड कॉरिडॉर तयार झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी तीन तासांवर येणार आहे. अर्थातच प्रवासाच्या वेळेत तब्बल दोन तासांची बचत होणार आहे.
दरम्यान याच महामार्ग संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रकल्पाच्या आखणीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. म्हणजे या प्रकल्पाचे महत्वाचे काम आता पूर्ण झाले आहे.
यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार अशी आशा आहे. दरम्यान आता आपण पुणे ते नाशिक दरम्यानच्या ग्रीन फील्ड कॉरिडोर ची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा आहे प्रकल्प ?
हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत पुणे ते नाशिक दरम्यान 213 किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर तयार होणार आहे.
हा मार्ग नासिक, अहमदनगर आणि पुणे या तीन शहरांना परस्परांना जोडणार आहे. या प्रकल्पासाठी दोन हजार हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार आहे. यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास तीन तासात पूर्ण होईल अशी आशा आहे.
या प्रकल्पासाठी 21,158 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. औद्योगिक कृषी पर्यटन शिक्षण अशा विविध क्षेत्राला यामुळे चालना मिळणार आहे.
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला यामुळे उभारी मिळणार आणि या परिसरातील एकात्मिक विकास सुनिश्चित होणार असे बोलले जात आहे.
हा मार्ग राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर या शहरांना जोडणार आहे. एकंदरीत पुणे ते नाशिक हा प्रवास या ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे जलद होणार आहे.