Pune News : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतील नागरिकांसाठी अर्थातच पुणे शहरातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. खरंतर, पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रो आल्यापासून अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत.
शहरातील दोन मेट्रो मार्ग गेल्या वर्षी सुरु झालेत आणि या मार्गांमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास जलद झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर मेट्रो धावत आहे.
यामुळे येथील प्रवाशांचा प्रवास जलद झाला आहे. याशिवाय शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पी एम पी एल च्या बसेसचा देखील मोठा वाटा आहे.
तसेच ओला आणि उबेर या प्रायव्हेट कॅब सर्विसेसचा देखील शहरातील नागरिकांना फायदा होत आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम झाली आहे. आता मात्र शहरातील ओला आणि उबेर या प्रायव्हेट कॅब सर्विसेस बाबत एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आठ दिवसांनी अर्थातच 20 फेब्रुवारी 2024 पासून शहरातील ओला आणि उबेरची सर्विस बंद राहणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
ओला आणि उबेरची सेवा बंद राहिल्यास प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो. ओला आणि उबेर येथील कॅब चालकांचे 20 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू होणार आहे.
पुणे आणि चिंचवड शहरातील कॅब चालकांचे कामबंद आंदोलन 20 तारखेपासून सुरू होणार आहे. कॅब चालक पुणे येथील आरटीओ ऑफिस जवळ निदर्शन करणार आहेत.
ओला आणि उबेर या कंपन्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेले दर लागू केले जात नसल्याचा आरोप आहे. यामुळे चालकांनी 20 फेब्रुवारीपासून बेमुदत्त संप पुकारला आहे.
खरे तर जिल्हाधिकाऱ्यांनी एक जानेवारी 2024 पासून कॅब कंपन्यांसाठी नवीन दर लागू केलेले आहेत. मात्र कंपन्यांनी या नवीन दराची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. यामुळे चालकांचे नुकसान होत आहे. परिणामी हे नवीन दर लागू करावेत अशी मागणी चालकांनी लावून धरली आहे.
याच मागणीसाठी चालक 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. याचा मात्र सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार असून शहरातील 20,000 चालक या संपात सहभागी होतील असा दावा करण्यात आला आहे.