Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पीएमपीएलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विशेष बस सेवा पुरवली जाणार आहे. यामुळे शिवप्रभू यांच्या जयंती सोहळ्याला जाणाऱ्या शिवभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खरे तर, 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवप्रभुरायांची जयंती संपूर्ण विश्वात मोठ्या जल्लोषात साजरा होत असते. आपल्या राज्यातही सर्वत्र मोठ्या आनंदात शिवप्रभूंचा जन्मदिन सोहळा मोठ्या थाटात संपन्न होत असतो.
दरम्यान अनेकजण शिवरायांच्या जयंती दिनानिमित्त छत्रपतींच्या शिवरायांच्या जन्म ठिकाणी अर्थातच जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीला आवर्जून भेट देत असतात.
यामुळे शिवप्रभूंच्या जयंतीदिनी किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अशातच यंदा शिवरायांच्या जयंती दिनानिमित्त किल्ले शिवनेरीला जाणाऱ्या शिवभक्तांसाठी पीएमपीएलने विशेष बस सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पी एम पी एल च्या माध्यमातून भोसरी ते जुन्नर या मार्गावर विशेष बस चालवली जाणार आहे.
यामुळे भोसरीहुन जुन्नरला जाणाऱ्या शिवभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. पीएमपीएलने दिलेल्या माहितीनुसार या विशेष बसेस 17 फेब्रुवारी 2024 पासून चालवल्या जाणार आहेत.
विशेष बाब अशी की ही बस सेवा 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्थातच शिवजयंती पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे शिवभक्तांना भोसरी ते जुन्नर असा प्रवास करणे सोयीचे होणार आहे.
आता आपण या विशेष गाड्यांचे वेळापत्रक कसे राहणार याविषयी पीएमपीएलकडून प्राप्त झालेली माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कस राहणार संपूर्ण वेळापत्रक
पीएमपीएलने दिलेल्या वेळापत्रकानुसार, 17 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत भोसरी ते जुन्नर ही बस सकाळी 5.30, 7.00, 8.30, 10.00, दुपारी 1.30, 3.00, 4.30, 6.00 वाजता सोडली जाणार आहे.
तसेच जुन्नर ते भोसरी बस सकाळी 9.30, 11.00, दुपारी 12.30, 2.00, 5.30, सायंकाळी 7.00, 8.30,10.00 वाजता सोडली जाणार आहे.