Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची अन आनंदाची बातमी हाती आली आहे. ती म्हणजे पुण्याला एका नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ची भेट मिळणार आहे. सध्या राज्यासह संपूर्ण देशात महामार्गाचे जाळे विकसित केले जात आहे.
रस्ते वाहतूक मजबूत बनवण्यासाठी आणि दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी महामार्गाचे जाळे तयार केले जात आहे. केंद्राने यासाठी भारतमाला परियोजना हा एक महात्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पांतर्गत संपूर्ण देशात महामार्गाचे जाळे तयार केले जात आहे. विशेष म्हणजे या परियोजनेअंतर्गत जे महामार्ग तयार केले जात आहेत ते सारे महामार्ग ग्रीन फिल्ड एक्सप्रेसवे आहेत.
अशातच आता महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असलेल्या पुण्याला एक नवीन ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे ची भेट मिळणार असे वृत्त समोर आले आहे.
खरंतर अलीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा मोठा विस्तार झाला आहे. या शहरांमधील लोकसंख्या देखील कमालीची वाढली आहे.
परिणामी शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पुणे-चाकण-शिंगणापूर हा देखील असाच परिसर आहे.
या भागात नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते. हेच कारण आहे की आता पुण्यात नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे.
पुणे चाकण शिंगणापूर परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता चाकण-तळेगाव ते शिंगणापूर पर्यंत एक उन्नत (एलिवेटेड) मार्ग तयार केला जाणार आहे.
यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत हरित द्रुतगती महामार्ग बीओटी तत्त्वावर विकसित केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली आहे. खरे तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर यादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात.
अशा परिस्थितीत हा महामार्ग फक्त पुणे-चाकण-शिंगणापूर परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठीच उपयुक्त ठरेल असे नाही तर यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास देखील आधीच्या तुलनेत गतिमान आणि सुरक्षित होणार आहे.