Pune News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम असलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील रस्ते आणि रेल्वे विकासाच्या प्रकल्पावर शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

यामुळे शहरातील आणि जिल्ह्यातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक सक्षम झाली आहे यात शंकाच नाही. विशेष म्हणजे पुण्यात अजूनही अनेक प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.

विमानसेवा मजबूत करण्यासाठी देखील शासन आणि प्रशासनाकडून सामूहिक प्रयत्न केले जात आहे. पुण्यातील विमानसेवा आधीच्या तुलनेत अधिक मजबूत व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

याचाच एक भाग म्हणून पुण्यात सध्याच्या विमानतळ परिसरात नवीन टर्मिनल तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नव्या टर्मिनलचे लवकरच उद्घाटन लवकरच होणार आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार या पुण्यातील नव्या टर्मिनल चे उद्घाटन येत्या दोन ते तीन आठवड्यात पूर्ण होणार आहेत.

या नव्या टर्मिनल प्रकल्पाची ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकतीच पाहणी केली आहे. या पाहणी दरम्यान त्यांना या प्रकल्पात काही त्रुटी आढळून आली यामुळे त्यांनी संबंधितांना ही त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच हा प्रकल्प येत्या दोन ते तीन आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वसामान्यांसाठी खुला होईल अशी माहितीही त्यांनी दिली. यासोबतच त्यांनी पुण्यातील पुरंदर विमानतळाबाबत देखील महत्त्वाचे अपडेट दिली आहे.

शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे पुरंदर विमानतळाला केंद्र शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. आता आम्ही राज्य सरकारकडून मिळणाऱ्या जागेच्या प्रतीक्षेत आहोत.

राज्य सरकारकडून पुरंदर विमानतळासाठी जागा मिळाली की लगेचच या विमानतळासाठीची पुढील कारवाई सुरू होईल अशी माहिती सिंधिया यांनी यावेळी दिली आहे. खरे तर मागील अनेक दिवसांपासून पुरंदर विमानतळा बाबत चर्चा सुरू आहेत.

मात्र राज्यातील सरकार बदलले की पुरंदर विमानतळाचा विषय मागे पडत राहतो. परंतु महायुती मधील शिंदे फडणवीस पवार सरकार पुरंदर विमानतळाबाबत सकारात्मक आहे आणि यामुळे लवकरच या विमानतळाचा विषय मार्गी लागेल आणि पुण्यातील जनतेला दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *