Pune New Expreesway News : पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प अधांतरी असतानाच शासनाने पुणे ते नाशिक दरम्यान औद्योगिक महामार्ग विकसित करण्याचा घाट घातला आहे. या औद्योगिक महामार्गामुळे पुणे, अहमदनगर आणि नासिक या तिन्ही जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असा दावा शासनाच्या माध्यमातून केला जात आहे.

यामुळे या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण होईल यासाठी शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र या औद्योगिक महामार्गाचा पुणे जिल्ह्यात कडाडून विरोध केला जात आहे.

या महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी या महामार्गाचा कडाडून विरोध केला असून कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी सरकार दडपशाही पद्धतीने आमच्या जमिनी ताब्यात घेत आहे.

या प्रकल्पात जमिनी गेल्यास शेतकरी विस्थापित होतील अशी भीती आहे, यामुळे हा महामार्ग रद्द केला गेला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. दरम्यान, या महामार्गाच्या विरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढू असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या जमीन मालकांनी आपल्या कुटुंबांसह येत्या १५ मे पासून तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा यावेळी दिला आहे. महामार्ग संघर्ष समितीचे नेते व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी या प्रकल्पाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असे म्हटले आहे. यामुळे आता या मार्गाबाबत सरकारकडून काय निर्णय घेतला जातो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *